मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खानच्या नात्याला २८ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या शाहरूख यशाच्या उच्च शिखरावर विराजमान झाला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं आणि चित्रपटगृहाचं फार जवळचं असतं.दिल्लीतील मल्टीप्लेक्स पीव्हीआर अनुपम चित्रपटगृहाची सुरूवात शाहरूखच्या 'यस बॉस' चित्रपटाच्या माध्यमातून झाली होती. परंतु हा चित्रपटगृह आता बंद झाला आहे.
अनुपम चित्रपटगृह लवकरच पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे. चित्रपटगृहाच्या नुतनीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आजच्या काळात मनोरंजन क्षेत्रात अनेक नवीन बदल घडत आहेत. या चित्रपटगृहासोबत शाहरूखच्या अनेक अठवणी जोडल्या आहेत.
त्यामुळे त्याच्या आठवणी ताज्या करण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष अजय बिजली यांनी चित्रपटगृहाला टाळा लावण्यासाठी त्याला आमंत्रित केले होते. लग्नाआधी शाहरूख आणि गौरी पंचशीलमध्ये राहत होते. दोघांच्या अनेक आठवणी अनुपम चित्रपटगृहासोबत जोडल्या आहेत.
दिल्लीमधील साकेत परिसरात असलेल्या या चित्रपटगृहामध्ये देशात पहिल्यांदा चार पडद्यांवर सिनेमांचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांनंतर देशभरात मल्टीप्लेक्सची सुरूवात झाली होती.