'तू यही है...' सिद्धार्थच्या आठवणीत तुम्हालाही भावूक करेल शहनाजचं गाणं

त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण शहनाज पुन्हा जगली, पण...

Updated: Oct 29, 2021, 01:50 PM IST
'तू यही है...' सिद्धार्थच्या आठवणीत तुम्हालाही भावूक करेल शहनाजचं गाणं  title=

मुंबई : 'मुझे गेम नही जितना, मुझे तुझे जितना है...' खरंच शेहनाज जिंकू शकली सिद्धार्थला? सिद्धार्थच्या निधनानंतर सर्वात मोठा धक्का अभिनेत्री शेहनाज गिलला बसला. सिद्धार्थचं निधन झालं आणि दोघांचा मार्ग वेगळा झाला. पण आज देखील सिद्धार्थ आपल्या आजूबाजूला असल्याचा भास सिद्धार्थच्या सनाला होत आहे. पण तसं पाहायला गेल तर सिद्धार्थ त्याच्या शेहनाजपासून खूप दूर गेला आहे. सिद्धार्थच्या निधनाला 2 महिने झाले आहेत, आजही या दुःखातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न शेहनाज करत आहे. 

आयुष्यातील सर्वात जास्त खास व्यक्तीला गमावल्यानंतर शेहनाज पुन्हा मोठ्या धैर्याने कामावर परतली आहे. अनेक दिवस ऐकटं राहील्यानंतर शाहनाजने सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहात एक भावूक गाणं प्रदर्शित केलं आहे. गाण्याचं नाव  'Tu Yaheen Hai' असं आहे.  पण आजही सिद्धार्थला मात्र शेहनाज विसरु शकलेली नाही. 

सिद्धार्थच्या निधनानंतर या नात्याचा डोलारा कोलमडला. शहनाज एकटी पडली आणि प्रत्येकालाच तिची चिंता वाटू लागली. आपल्या आयुष्यात सिद्धार्थच्या जाण्यानं इतकी मोठी पोकळी निर्माण झालेली असतानाही शहनाज आता स्वत:ला सावरु लागली आहे. 

एका खास व्यक्तीसाठी खास अंदाजात काहीतरी करण्यासाठी शहनाजनं हे पाऊल उचललं आहे. या निमित्तानं त्याचं आपल्या जवळ नसणं, ही तिच्या मनातील खंत लगेचच समोर येत आहे. किंबहुना सिद्धार्थच्या विचारानंच शहनाजची काय अवस्था होत असेल, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत आहे.