डीपनेक ड्रेसमध्ये मीरा राजपूतने काढला बोल्ड सेल्फी, फोटो व्हायरल

 शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मीडिया क्वीन आहे.

Updated: Jan 23, 2022, 02:15 PM IST
डीपनेक ड्रेसमध्ये मीरा राजपूतने काढला बोल्ड सेल्फी, फोटो व्हायरल title=

मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मीडिया क्वीन आहे. तिचं सौंदर्य बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मागे टाकतं. त्यामुळे तिची फॅन फॉलोईंगही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. मीरा इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रिय असते आणि दररोज तिच्या फोटोंद्वारे लोकांचं लक्ष वेधून घेते. मीराने पुन्हा एकदा तिच्या एका सेल्फीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

सेल्फीचा सोशल मीडियावर बोलबाला
आता मीरा राजपूतने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो मिरर सेल्फी आहे. ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे. चाहते तिच्या सौंदर्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत. या फोटोमध्ये ती डीपनेक ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो तिने शेअर करताच व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फॅन्स म्हणाले डेब्यू कधी करणार आहे?
या फोटोत मीरा राजपूत ईतकी क्यूट दिसत आहे की, लोकं तिला विचारत आहेत की तू चित्रपटात कधी पदार्पण करणार आहेस. फोटोसोबत मीराने कॅप्शनमध्ये लिहिलं 'सनसाईनची एक बाजू घेऊन.' या फोटोवरील कमेंटमध्ये लोकं तिच्यासाठी हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.