मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर शाहिदच्या आयुष्यात 'ती' आलीच! आता वाढणार का मीराची डोकेदुखी?

शाहीद कपूर आणि मीरा कपूर हे कपलही बॉलीवूड इंडस्ट्रीतील क्यूट कपल आहे.

Updated: Aug 26, 2022, 04:18 PM IST
मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर शाहिदच्या आयुष्यात 'ती' आलीच! आता वाढणार का मीराची डोकेदुखी? title=

Shahid Kapoor New Bike: शाहीद कपूर (Shahid Kapoor) आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमीच त्याच्या चाहत्यांची मनं जिंकून घेतो. कबीर सिंग (Kabir Singh) या चित्रपटानंतर शाहीद कपूर (Shahid Kapoor) यशाच्या शिखरावर तर पोहचलाच पण त्याच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले. आजही हा चित्रपट तरूणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून आजही कबीर सिंगची गाणी गुणगुणली जातात. (shahid kapoor welcomes new ducati bike at his home pics goes viral)

शाहीद कपूर आणि मीरा कपूर (Mira Kapoor) हे कपलही बॉलीवूड इंडस्ट्रीतील क्यूट कपल आहे. त्याच्यांसारखेच रिलेशन आपलेही असावे अशी अनेक कपल्सचीही मनोमनी इच्छा असते. पण आता शाहीदच्या एका नव्या करामतीमुळे मीराची डोकेदुखी वाढणार की काय? अशी भिती चाहत्यांना वाटू लागली आहे. 

सध्या शाहीद कपूर इन्टाग्रामवरून आपले फॅमिली फोटो टाकत असतो आणि आपल्या चागत्यांना नेहमीच अपडेट करत असतो. त्यातून त्याच्याकडे बाईक्सचेही मोठे कलेक्शन आहे. आता त्यात अजून एका नव्या मेंबरची भर पडली आहे. शाहीदने नुकतीच एक नवीन स्क्रॅम्बलर डुकाटी डेझर्ट स्लेड (Ducati Bike) बाईक खरेदी केली आहे.

शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर नवीन बाईकसोबतचा फोटो शेअर केला आहे. ही बाईक चमकदार निळ्या रंगातली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बाईकची किंमत 12-14 लाख रुपये आहे. शाहिद कपूर हा बाइकप्रेमी आहे. इंस्टाग्रामवर चाहत्यांनीही शाहिद कपूरच्या नवीन बाईकवर भरभरून कमेंटस् केल्या आहेत. 

इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या फोटोमध्ये शाहिद कपूर काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम पॅंटमध्ये दिसतो आहे. डुकाटीची नवीन स्क्रॅम्बलर चालवताना त्याने हेल्मेट आणि बाइकरचे हातमोजे देखील घातले आहेत. नवीन बाईकसोबत त्याने छान पोझ दिली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या इमेजमध्ये त्याने "Scramblin' around" असे लिहिले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे शाहीदला बाईकींगची फार आवड आहे. त्याचसोबत आता या बाईकवरून शाहीद फिरायला कुठे कुठे जाणार याच्याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

डुकाटी स्क्रॅम्बलर डेझर्ट स्लेडचं वैशिष्ट्यं तुम्हाला माहित आहे का? 
Ducati Scrambler Desert Slade बाईक 2 पर्यायांसह येते. ज्यात दोन रंग असतात. या बाईकमध्ये 803 cc BS6 इंजिनची पॉवर आहे. बाईकमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. Ducati बाईकला पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक असतात. या बाईकमध्ये 13.5 लीटर इंधन क्षमता आहे.