मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) अखेर त्याच्या नवीन डुप्लेक्समध्ये शिफ्ट झाला आहे. 58 कोटी रुपयांचे हा डुप्लेक्स मुंबईच्या वरळी भागात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की शाहिदने पत्नी मीरा राजपूतसोबत (Meera Rajput) 2018 मध्ये त्यांचं हे घर बुक केलं होतं आणि 2019 मध्ये त्यांना त्यांच्या नवीन अपार्टमेंटचे हक्क मिळाले. करोना लॉकडाऊनमुळे तो त्याच्या नवीन घरात शिफ्ट होऊ शकला नाही. पण आता हे जोडपं आपल्या मुलांसह या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. तसे या घराच्या बाल्कनीतून बाहेरचे सुंदर दृश्य दिसते. त्याच्या घराचे आतील काही फोटोही समोर आले आहेत.
पिंकव्हिलाच्या वृत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, शाहिद आणि मीरा कुटुंबासोबत वरळीतील हाई राइज 3 सिक्स्टी वेस्टमध्ये शिफ्ट झाले आहेत, जिथून वांद्रे-वरळी समुद्राचे दृश्य सर्वात चांगले दिसतात. या जोडप्याच्या नवीन घराची किंमत 58 कोटी रुपये आहे. दोघांनी मिळून या घराचं इंटीरियर डिझाईन केलं आहे, जे दिसायला खरोखरच नेत्रदीपक आहे. या डुप्लेक्ससोबत शाहिदला सहा पार्किंग मिळाल्या आहेत. याशिवाय त्यांच्या घरात 500 स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. (shahid kapoor mira rajput finally moved to their 58 crore duplex home in worli view photos )
या जोडप्याच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना घरी जाऊन पाच दिवस झाले आहेत. त्यांचं हे घर 42 व्या आणि 43 व्या मजल्यावर आहे. नवीन घर घेताना शाहिदनं एका मुलाखतीत सांगितले होतं की, मुलं मोठी होत आहेत आणि त्यांना जागेची गरज भासेल. सध्या माझ्या घरातील सर्व जागा माझ्या मुलांची आहे. मीरा आणि मलाही जागा हवी आहे. कालांतरानं, कुटुंबासाठी अधिक जागा असणं महत्वाचं आहे.
यावर्षीचा शाहिदचा 'जर्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपट आपल्या बजेटचा खर्चही वसूल करू शकला नाही. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत होती. त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं तर तो 'ब्लडी डॅडी' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. शाहिद त्या आधी शेवटी 'कबीर सिंग या चित्रपटात दिसला होता.