लॅक्मे फॅशन वीक 2018 : पहिल्यांंदा शाहीद कपूर पत्नीसोबत रॅम्पवर झळकला

मायानगरी मुंबईमध्ये बुधवारपासून लॅक्मे फॅशन वीक 2018 ला सुरूवात झाली आहे. पुढील पाच दिवस हा ग्लॅमरस सोहळा रंगणार आहे. पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. 

Updated: Feb 1, 2018, 04:21 PM IST
लॅक्मे फॅशन वीक 2018 : पहिल्यांंदा शाहीद कपूर पत्नीसोबत रॅम्पवर झळकला  title=

मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये बुधवारपासून लॅक्मे फॅशन वीक 2018 ला सुरूवात झाली आहे. पुढील पाच दिवस हा ग्लॅमरस सोहळा रंगणार आहे. पहिल्याच दिवशी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. 

कोणत्या कलाकरांनी घेतला सहभाग ?

 लॅक्मे फॅशन वीक 2018 मध्ये पहिल्या दिवशी तापसी पन्नू डिझायनर रितू कुमारसाठी रॅम्प वॉक करताना दिसली. बॉलिवूडप्रमाणे दक्षिण भारतातील कलाकारांनीही हजेरी लावली होती. यावेळेस हंसिका मोटवानीने रॅम्पवॉक केला.डिझायनर अनिता डोंगरेचा ड्रेस घालून अभिनेत्री डायना पेन्टी,यामी गौतम व शमिता शेट्टीदेखील रॅम्पवर उतरली होती. 

पहिल्यांदा शाहीद आणि मीरा एकत्र  

अभिनेता शाहीद कपूरदेखील रॅम्पवर उतरला होता. मात्र यंदा पहिल्यांदाच शाहीदसोबत त्याची पत्नी मीरादेखील रॅँपवर उतरली होती. दोघांनीही पांढर्‍या रंगाची थीम निवडली होती. शाहीद जोधपुरी सूटमध्ये तर मीरा पांढर्‍या रंगावर फ्लोरल प्रिंट असलेल्या लेहंग्यामध्ये दिसली.