'त्याने मला रात्रभर...' शाहिदबद्दल अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्य

शाहिदबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?   

Updated: May 21, 2022, 03:40 PM IST
'त्याने मला रात्रभर...' शाहिदबद्दल अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्य title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कधी काय होईल कोणालाही माहिती पडणार नाही. पण काही दिवसांनी सर्व गोष्टी सर्वांसमोर येतात. त्या गोष्टीमुळे कधी वाद निर्माण होतात किंवा चर्चांना उधाण येत. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहिद कपूर देखील अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आला. शाहिद बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कंगना रानौत आहे. वादाचा मुकूट कायम डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत कायम तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

आता कंगना अभिनेता शाहिद कपूरसोबत घालवलेल्या त्या एका रात्रीमुळे चर्चेत आली आहे. हा किस्सा ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कंगनाने सांगितले की, तिने शाहिदसोबत रात्र घालवली आहे. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती.

कंगनासोबतचा 'किसिंग सीन'.... नुसता चिखल- शाहिद कपूर

त्या रात्रीबद्दल सांगताना कंगना म्हणाली, 'रंगून सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. शुटिंगनंतर सर्वांना एका ठिकाणी राहायचं होतं. पण राहण्यासाठी खोल्यांची संख्या कमी असल्यामुळे  कंगना आणि काही क्रू मेंबर्सना एकाच खोलीत राहावे लागले.'

त्यावेळी शाहिद आणि क्रू मेंबर्स रात्रभर गाणी गातं राहिले, ज्यामुळे कंगनाला झोप लागत नव्हती. त्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि ती रात्र कंगनासाठी त्रासदायक ठरली. कंगनाचा हा किस्सा सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

कंगना रानौतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘तेजस’, ‘टिकू वेड्स शेरू’, ‘धाकड’ सारख्या अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. तिच्या सिनेमांच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.