मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचे रिलिज झालेले सिनेमे यंदा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल केलेली नाही.
यंदा सलमान खानचा 'ट्यूबलाइट' हा सिनेमा देखील तोंडावर पडला तसाच शाहरूख खानचा 'जब हैरी मेट सेजल' या सिनेमाने देखील अपेक्षेपेक्षा फारच कमी कमाई केली. शाहरूख खानच्या 'रईस' या सिनेमाने यंदाच्या वर्षाची सुरूवात ठिकठाक केली असली तरीही 'जब हैरी मेट सेजल' हा सिनेमा मात्र तेवढा चालला नाही. या सिनेमामुळे डिस्ट्रिब्युटरला प्रचंड नुकसान झाले.
आता अशी माहिती मिळत आहे की, सिनेमाच्या रिलिजनंतर ४ महिन्यांना या किंग खानने डिस्ट्रिब्युटर्सचे झालेले नुकसान भरून दिले आहे. शाहरूखने त्यांना मोठी रक्कम दिली असून त्यांच झालेलं नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मीडियाच्या माहितीनुसार, शाहरूखने सिनेमाचे राइट्स विकत घेणाऱ्या स्टुडिओला १५ टक्क रक्कम परत दिली आहे. एवढंच नाही तर डिस्ट्रिब्युटर्सना देखील शाहरूख खानने त्यांना ३० टक्के रक्कम परत करून नुकसान कमी
करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की"जब हैरी मेट सेजल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. आणि शाहरूखचा हा फ्लॉप सिनेमा ठरला. मात्र शाहरूख खानने सिनेमाचे डिजिटल आणि सॅटेलाइट राइट्स विकून पैसे काढले आहेत. अशाच पद्धतीने या अगोदर दिग्दर्शक सलीम खान यांनी देखील आपल्या एका सिनेमाच्या डिस्ट्रिब्युटर्सला असे पैसे परत केले होते. यामुळे आपल्याला कळतं की, बॉलिवूडमध्ये आजही काहीजण अगदी सच्चेपणाने व्यवहार करताना दिसतात.