शाहरूखच्या बॉडीगार्डचा पगार CEOच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त

किंग खानच्या खासगी गोष्टी कोट्यावधीच्या घरात 

Updated: Oct 28, 2021, 06:58 AM IST
शाहरूखच्या बॉडीगार्डचा पगार CEOच्या वार्षिक पगारापेक्षा जास्त  title=

मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि त्याचा परिवार सध्या खूप चर्चेत आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. शाहरूख खानच्या सुरक्षेची जेव्हा चर्चा होते तेव्हा बॉडीगार्ड रवी सिंह (Ravi Singh) च्या नावाची चर्चा होते.

रवी सिंहचा पगार ऐकून धक्काच बसेल 

रवी सिंह गेल्या 10 वर्षांपासून शाहरुख खानची सुरक्षा सांभाळत आहेत. बॉलीवूड लाइफमधील एका रिपोर्टनुसार, रवी सिंह हा शाहरुख खानचा सुरक्षा प्रमुख आहे आणि त्याचा पगार इतका आहे की, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. शाहरुख खानच्या सुरक्षेसाठी रवी दरवर्षी २.७ कोटी रुपये घेतात.

कुटुंबाच्या सुरक्षा देखील सांभाळतो रवी 

मात्र, रवी सिंहची जबाबदारी केवळ शाहरुख खानची सुरक्षा हाताळण्यापुरती मर्यादित नाही. शाहरुख खान व्यतिरिक्त तो आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खानच्या संरक्षणाचे काम करतो. एवढेच नाही. रवी सिंहला शाहरुख खानच्या दिवसभरातील प्रत्येक हालचालींची आधीच माहिती असते आणि तो त्याच्यासोबत सावलीसारखा राहतो.

वादाच्या भोवऱ्यात अडकला शाहरूखचा बॉडीगार्ड 

2014 मध्ये रवी सिंह खूप चर्चेत आला होता. एका मुलीने त्याच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता. वास्तविक रवी गर्दीवर नियंत्रण ठेवत असताना त्याने गर्दीत उभ्या असलेल्या या मुलीला ढकलले. आर्यनच्या खटल्याबद्दल बोलायचे झाले तर आजही त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सध्या शाहरूख खान फक्त आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळेच नाही तर त्याच्या खासगी गोष्टींमुळे देखील चर्चेत आहे. शाहरूख खानच्या विजेच्या बिलाची देखील जोरदार चर्चा रंगली होती. शाहरूख खानचं महिन्याचं विजेचं बिल तब्बल 45 लाख रुपये इतकं आहे.