लॉकडाऊनमध्ये शाहरूख खानने गमावली जवळची व्यक्ती

मला तुझी खूप आठवण येईल मित्रा... म्हणत व्यक्त केली भावना 

Updated: May 16, 2020, 01:27 PM IST
लॉकडाऊनमध्ये शाहरूख खानने गमावली जवळची व्यक्ती  title=

मुंबई : गेल्या महिन्यापासून बॉलिवूड जगतातून फक्त धक्कादायक बातमी समोर येत आहे. एप्रिलच्या अखेरीस दोन दिग्गज कलाकार सिनेसृष्टीला सोडून गेले. त्यापाठोपाठ आता शाहरूख खानच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगातून निरोप घेतला आहे. शाहरूख खानने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. 

शाहरूख खानचा अगदी जवळचा मित्र अभिजीत यांच निधन झालं आहे. SRK ची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील सर्वात महत्वाचे सदस्य आणि शाहरूखचे अगदी जवळचे मित्र अभिजीत यांच निधन झालं आहे. अभिजीत यांच्या जाण्याने शाहरूख खानला मोठा धक्का बसला आहे. अभिजीत यांना श्रद्धांजली वाहताना शाहरूखने भावूक पोस्ट लिहिली आहे. 

शाहरूख खाननs, 'तुमको न भूल पाएंगे' म्हणत व्यक्त केल्या भावना. रेड चिलीजच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अभिजीत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रेड चिलीजच्या पहिल्या टीममधील सदस्य अभिजीत यांच्या अचानक जाण्याने आम्हाला खूप मोठा धक्का बसला आहे. 

यावर किंग खान म्हणतो की,'आम्ही ड्रीम्ज अनलिमीटेडसोबत सिनेमा बनवण्याचा प्रवास सुरू केला होता. अभिजीत माझे सर्वात चांगले सहकारी होते. आम्ही काही योग्य केलं काही अयोग्य. मात्र आम्ही पुढे चालत राहिलो. अभिजीत संपूर्ण टीममधील सर्वात चांगले सदस्य होते. मला तुझी खूप आठवण येईल मित्रा...' असं म्हणत शाहरूख खानने व्यक्त केली भावना.