''अन्यथा माझं अस्तित्व संपेल...'' शाहरूख खानच्या डुप्लिकेटचा दावा?

Shah Rukh Khan Duplicate: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. तेव्हा आता त्याच्या Jawan या चित्रपटामुळे त्याची चर्चा रंगली आहे. अशाच आता शाहरूख खानच्या डुप्लिकेटचीही चर्चा रंगली आहे. परंतु त्याचे वक्तव्य हे जास्तकरून चर्चेत आले आहे.

गायत्री हसबनीस | Updated: Jul 14, 2023, 02:06 PM IST
''अन्यथा माझं अस्तित्व संपेल...'' शाहरूख खानच्या डुप्लिकेटचा दावा? title=
July 14, 2023 | shah rukh khan duplicate ibrahim qadri says he will never meet shahrukh khan (Photo: Zee News)

Shah Rukh Khan Duplicate: शाहरूख खानचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. सोबतच यावेळी चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या 'जवान' या चित्रपटाची. या चित्रपटाचा प्रिव्ह्यू सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी या चित्रपटानं अक्षरक्ष: प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूखचा हा मोस्ट अवेडेट चित्रपट कधी रिलिज होतोय याची. याच वर्षी त्याचा 'पठाण' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती त्यामुळे यावेळी हा चित्रपट भारतात सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन असलेला चित्रपट ठरला आहे. परंतु यावेळी शाहरूख खानच्या चित्रपटांची जशी चर्चा रंगली आहे त्याचप्रमाणे यावेळी शाहरूखच्या एका डुप्लिकेटचीही चर्चा रंगली आहे. परंतु सध्या या डुप्लिकेटनं केलेलं वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

आत्तापर्यंत शाहरूखचे अनेक चाहते प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यामुळे त्यांची अनेकदा चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आता चर्चा आहे ती म्हणजे इब्राहिम कादरी याची. सध्या हा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. परंतु यावेळी त्यानं दिलेल्या मुलाखतीत शाहरूखबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. आपल्याच डुप्लिकेटला शाहरूख खानला भेटण्याची चांगलीच इच्छा असेल परंतु यावेळी या हुबेहुब दिसणाऱ्या शाहरूखनं मात्र शाहरूखला न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यानं केलेल्या वक्तव्याची. या लेखातून जाणून घेऊया की तो नक्की काय म्हणाला आहे? त्याला शाहरूखला भेटावं का वाटतं नाहीये? इतक्या मोठ्या सुपरस्टारचा डुप्लिकेट असूनही त्याला ही खंत का वाटते आहे? 

हेही वाचा - ''आता वेळ आलीये...'' Chandrayan 3 साठी खिलाडी कुमार काय म्हणाला पाहा

इब्राहिम हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे त्यातून यावेळी त्याच्या हुबेहुब दिसण्यावरून त्याला आणि शाहरूखला एकत्र पाहिल्यावर कोण इब्राहिम आणि कोण शाहरूख हेही कळलं मुश्किल आहे. अशावेळी तुम्हीही गडबडून जाल हेही नक्की. सध्या त्यानं 'हिंदुस्थान टाईम्स'ला एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्यानं सांगितले की, ''मला वाटतं ज्यादिवशी मी शाहरुख सरांना भेटेन त्यादिवशीच सगळं संपून जाईन. कारण जेव्हा तुमच्याकडे फेरारी नसते तेव्हा तुम्हाला तिची फार क्रेझ असते तरीही ती तुम्हाला हवी असते. पण एकदा ती तुम्ही विकत घेतली की तिला तुम्ही गॅरेजमध्ये ठेवाल. ती तिथेच पडून राहील आणि तुम्ही बाईकवरूव फिरायला जाल. त्याचप्रमाणे त्यांना भेटलो तर माझीही क्रेझ संपेल. त्यांना मला भेटायचं असेल तर मी नक्कीच भेटेन पण मी स्वतःहून कधीच त्यांना भेटणार नाही.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''शाहरुख खानच्या 'रईस' चित्रपटानंतर मी ते गांभीर्याने घेतले. मी फक्त 10 टक्के शाहरुख सरांसारखा दिसतो पण नंतर मी माझ्या शरीरावर, केसांवर, वागण्यावर काम केले. आता मी 30 टक्के त्यांच्यासारखा दिसतो'', असं तो पुढे म्हणाला.