शाहरुखवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, म्हणाला 'मी वेळेवर हजर राहीन"

आलियाच्या अभिनयाच्या प्रेमात लाखो चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आहे. रोमान्सचा बादशाह  शाहरुख खानदेखील आलियाच्या कामावर फिदा आहे. 

Updated: Jul 4, 2021, 08:51 AM IST
शाहरुखवर आली आलियाकडे काम मागण्याची वेळ, म्हणाला 'मी वेळेवर हजर राहीन" title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भटने  डार्लिंग्स या सिनेमाच्या शुटींगला नुकतीच सुरुवात केलीये. या सिनेमाच्या निमित्ताने आलिया प्रोड्यूसर म्हणून डेब्यू करतेयं. आलियाने  सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. पहिला दिवस असल्याने आलिया एक्साइटेड आणि नर्वस देखील आहे.

आलियाच्या अभिनयाच्या प्रेमात लाखो चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आहे. रोमान्सचा बादशाह  शाहरुख खानदेखील आलियाच्या कामावर फिदा आहे. त्यामुळे थेट शाहरुखने आलियाला सिनेमात काम देण्याची मागणी केलीये.

आलियाने सेटवरील फोटो शेअर करताच याची दखल शाहरुखने घेतली. आलियाच्या कामाचं कौतुक देखील त्यांने केलं. त्यानंतर आलियाच्या ट्विटला रिट्विट करत
शाहरुखने आलियाकडे सिनेमात काम करायला संधी देण्याची मागणी केलीये.

शाहरुखने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, "या प्रोडक्शन नंतर मला तुझ्या आगामी होम प्रोडेक्शनच्या प्रोजेक्टसाठी साईन करुन घे, मी शुटींगला नेहमी वेळेवर हजर  राहीन आणि अगदी प्रोफेशनल राहून काम करेन, हे वचन देतो"