VIDEO : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल

Shah Rukh Khan and Kajol K3G deleted scenes : शाहरुख खान आणि काजोलचे 'कभी खुशी कभी गम' मधील स्टीमी सीन्स तुम्ही पाहिलेत का? 22 वर्षांनी आता सोशल मीडियावर होतायत व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Feb 14, 2024, 11:00 AM IST
VIDEO : 'कभी खुशी कभी गम' मधील शाहरुख आणि काजोलचे डिलीटेड रोमॅन्टिक सीन्स आता होताय व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan and Kajol K3G deleted scenes : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल या दोघांची ऑनस्क्रिन जोडी सगळ्यांनाच आवडली आहे. त्या दोघांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र, तुम्हाला माहितीये का की 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील त्यांची लव्ह स्टोरी ही आजही लाखो लोकांच्या हृदयात घर करून आहे. पण तुम्हाला माहितीये का? त्याचं कारण म्हणजे या चित्रपटातून एका कुटुंबातील लोकांनमध्ये एकमेकांविषयी किती प्रेम आहे ते पाहायला मिळालं. या चित्रपटाची पटकथा ही वडील आणि मुलाच्या नात्याच्या अवतीभोवती फिरताना दिसते. पण तुम्हाला माहितीये का की या चित्रपटातून काही सीन्स होते जे कधी आपण चित्रपटात पाहिलेज नाही. त्यातील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 

रेडिटरवर एका नेटकऱ्यानं कभी खूशी कभी गम या चित्रपटातील एक डिलीटेड सीन शेअर केला आहे. या क्लिपमध्ये शाहरुख आणि काजोलचे काही इंटिमेट सीन पाहायला मिळत आहेत. तर काजोलनं या सीन्समध्ये स्ट्रॅपी ड्रेस परिधान केले आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरुख खान हा लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. तर काजोल फ्लर्टी अंदाजात त्या फ्रेममध्ये येताना दिसते. काजोल शाहरुखला आवाज देते त्यानंतर शाहरुखनं तिच्याकडे कटाक्ष टाकला त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की काजोल खूप सुंदर दिसते. त्यानंतर त्यांच्यात काही स्टीमी सिन पाहायला मिळाले आहेत. त्यात ते डान्स करताना देखील दिसले.

त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी म्हणाला, 'जिन्यावरचा सीन मला फार आवडला. संपूर्ण व्हिडीओ मस्त आहे, मात्र मला एक कळतं नाही की हे सीन्स कट का केले.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लहाणपनी मी आणि माझे सगळे मित्र विचार करायचो की या दोघांचं खरंच लग्न झालंय किंवा त्यांचं लग्न होणार आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या दोघांचा तो सीन चित्रपटात का दाखवला नाही?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मला हे आता का पाहायला मिळतंय या आधी किंवा चित्रपटात का नाही मिळालं?'