मुंबई : लग्नसमारंभातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. त्यातच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ गाजण्याचं कारण म्हणजे, एक अभिनेत्री.
सहसा बिदाई, अर्थात पाठवणीच्या वेळी नववधूच्या अश्रूंचा बांध फुटतो. माहेरच्यांना सोडून जाण्याचं दु:ख दाटून आल्यामुळं तिला या वेदना असह्य होतात.
एक अभिनेत्री मात्र याला अपवाद ठरत आहे. जी स्वत:च्याच बिदाईच्या वेळी किंकाळ्या फोडताना, जोरजोरात हसताना दिसली.
ही अभिनेत्री आहे, श्रद्धा आर्या. दिल्लीमधील नौदल अधिकारी राहुल शर्मा याच्याशी श्रद्धानं नुकतीच लग्नगाठ बांधली. ज्यानंतर तिच्या लग्नातील अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये श्रद्धाची बिदाई पाहायला मिळत आहे. जिथे ती रडत नसून, मुझे याद रखना दोस्तो... बहुत जलना दोस्तों... असं काहीतरी बोलत मित्रमंडळींशी थट्टामस्करी करताना दिसत आहे.
श्रद्धा आर्याचा हा अंदाज आणि तिचा हा व्हिडीओ सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणताना दिसत आहे.
हा एकच व्हिडीओ नव्हे, तर श्रद्धाच्या लग्नसोहळ्यातील आणखीही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जिथं तिचा आणि राहुलचा विवाहसोहळा नेमका किती रंगतदार होता याची झलक पाहायला मिळत आहे.