Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर गाजले हे 'Sensational Video'

प्रत्येक जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत असतो.

Updated: Dec 29, 2019, 04:44 PM IST
Year Ender 2019 : यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर गाजले हे  'Sensational Video' title=

मुंबई : आताच्या धावळीच्या जगात प्रत्येक जण व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेत असतो. सोशल मीडियाची ताकद अनन्यसाधारण आहे. एका साधारण व्यक्तीला रात्रीत स्टार बनवण्याची धमक या सोशल मीडियामध्ये आहे. आता इंटरनेटचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. त्यामुळे जग फार जवळ आलं आहे. तर यंदाच्या वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार नावारूपास आले. त्यामध्ये एक नाव म्हणजे रानू मंडल. 

रानू मंडल
आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. हा दिवस त्यांच्या जीवनात गायक हिमेश रेशमियामुळे आला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांची गाणी गात आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज यशाच्या मार्गाकडे प्रवास करत आहे. त्यांच्या या प्रवासाला जोड आहे ती म्हणजे त्यांना मिळालेल्या दैवी देणगीची म्हणजे त्यांच्या आवाजाची.

त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं, असाच अनुभव त्या सध्या घेत आहेत.  

अभिनेत्री प्रियांका चोप्रा
स्विमिंगपूलमध्ये प्रियांकाचा एका लहान मुलीसोबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. प्रियांकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. प्रियांकाचा हा अनोखा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच भावला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s the weekend... time for my kind of punchpumaindia @dr.siddhant.bhargava

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

अभिनेत्री सारा अली खान 
'या विकएण्डला माझं बॉक्सिंग कौशल्य पाहा' असं कॅप्शन देत साराने एक व्हिडिओ पोस्ट केला. तो व्हिडओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It’s the weekend... time for my kind of punch @pumaindia @dr.siddhant.bhargava

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

जसलीन मथारू
'बिग बॉस'च्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली जसलीन तिच्या आणि भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. मध्यंतरी तिचा झाडू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. ती स्वत:च्या घरासाठी झाडू खरेदी करत होती. त्यामुळे ती कोणता झाडू चांगला आहे. त्याची तपासणी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.