प्रिया प्रकाशचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल; चर्चा तर होणारच...

साऊथची अभिनेत्री प्रिया प्रकाश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. 

Updated: Mar 9, 2022, 05:25 PM IST
प्रिया प्रकाशचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल; चर्चा तर होणारच... title=

मुंबई : साऊथची अभिनेत्री प्रिया प्रकाश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती दररोज इंस्टाग्रामवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते आणि तिच्या चाहत्यांना तिच्या प्रोजेक्ट्सची माहितीही देत ​​असते. प्रिया प्रकाश तिच्या एका व्हिडिओमुळे रातोरात प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर प्रियाचा डोळे मारतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे देशभरात तिचं फॅन फॉलोअर्स वाढलं आहे. आता प्रिया प्रकाशने तिचा लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियाची वेगळी स्टाइल दिसत आहे.

प्रिया प्रकाशचा लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल होत आहे. 'जब सैयां आये शाम को तो लग गये चांद मेरे नाम को' या गाण्यावर तिने रील शेअर केलं आहे. यामध्ये प्रिया इंडियन ब्युटी दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा पारंपारिक पोशाख स्कर्ट आणि ब्लाउज परिधान केला आहे. यासोबतच तिच्या पायाला आलता लावल्याचं दिसत आहे. नेकलेस आणि कानातल्यांसोबतच ट्रॅडिशनल लूक देण्यासाठी तिने डोळ्यांवर बिंदी लावली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओला फॅन्सने भरपूर पसंती दिली आहे. एका फॅनने कमेंट करत लिहीलं आहे की, 'क्रश' तर अजून एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, 'उफ्फ ये अदा' याचबरोबर बरेच चाहते कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर ईमोजी शेअर करत आहेत.