Body Shamming : किम कर्दाशियनची बहिण क्लोईचं व्हायरल हॉट फोटोवर स्पष्टीकरण, मला बदनाम करू नका

सेलिब्रिटी किम कर्दाशियनची बहीण क्लो कर्दाशियन हिनं नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे

Updated: Apr 8, 2021, 08:38 PM IST
Body Shamming : किम कर्दाशियनची बहिण क्लोईचं व्हायरल हॉट फोटोवर स्पष्टीकरण, मला बदनाम करू नका title=

मुंबई : सेलिब्रिटी  किम कर्दाशियनची बहीण क्लो कर्दाशियन हिनं नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवर स्पष्टीकरण दिलं आहे. क्लोईने म्हटलं आहे की, तिने आपली टोन्ड बॉडी मिळविण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत, म्हणून बॉडी शेमिंग करणार्‍यांना बदनाम करू नका आणि असंही म्हणू नका की, टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी पैसे खर्च केले आहेत एका वृत्तानुसार, क्लो आणि तिच्या टीमने सोशल मीडियावरून व्हायरल होणारे फोटो  काढून टाकण्यासाठी बरीच मेहनत घेतली. पण त्यात ते फारसे यश मिळू शकले नाही.

काय म्हणाली क्लोई?
क्लो कार्दाशियनने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तिने संपूर्ण आयुष्य ते शरीराला घेऊन आपली बनवलेली प्रतिमा मोडण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये तिचं संपूर्ण शरीर पूर्णपणे अनरिटच्ड  आहे म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेपासून मी दूर राहिली आहे आणि मी जशी आता दिसते आहे तशीच मी वास्तविक जीवनात दिसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Khloé Kardashian (@khloekardashian)

जर कोणी तुमचा फोटो योग्य प्रकारे काढला नाही तर हा फोटो शेअर करण्यास नकार द्या तुम्हाला या संदर्भातील पूर्णपणे हक्क आहे. तसंच आपल्याला असं सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. जरी ती व्यक्ति आपल्याला कितीही जवळचा महत्वाचा असला तरीही.

एका पोस्टमध्ये तिने आपल्या चाहत्यांना एक मोठा संदेश दिला आहे आणि लिहिले आहे की, मी काही दिवसांपूर्वीच लाईव्ह केलं होतं. जे फोटोशॉप केलेलं नव्हतं. ज्यामध्ये त्याचे टोन्ड बॉडी स्पष्टपणे दिसू शकते. आपल्या पोस्टमध्ये, क्लोईनं लिहिले आहे की, तिने आपल्या आयुष्यात आपल्या बॉडीसाठी कठोर संघर्ष केला आहे आणि तिला दररोज ते लोकं ट्रोल करतात ज्यांची खऱ्या आयुष्यात बॉडी वाईट आहे

ती आपल्या जीवनात बेस्ट फिगर मध्ये आहे आणि अशी फिगर बनवण्यासाठी ती दुसऱ्यांचीदेखील मदत करते. तिच्याकडून असं सांगण्यात आलं होतं की, आपल्याला पैशांशिवाय असे शरीर मिळू शकत नाही, परंतु सत्यता ही आहे की कठोर परिश्रम घेतल्याशिवाय काहीच शक्य नाही.

सेलिब्रिटींचे कुटुंब
अमेरिकन रिअॅलिटी टीव्हीचा सुपरस्टार किम कार्दशियनची बहीण  बहीण, क्लोई या दिवसांत एक आई आहे आणि ती एकटीच आपल्या मुलाचे संगोपन करत आहे. तिचा नवरा लॅमर जोसेफसोबतचे संबंध इतके खराब झाले होते की लॅमरने तिच्यावर हल्ला केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

जे नंतर त्यानेदेखील स्वीकारले. किमची दुसरी बहीण काइली जेनर देखील एक सेलिब्रिटी आहे आणि ती तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. घटस्फोटाच्या बातम्यांवरून किम कार्दशियन पती कान्ये वेस्टबरोबर कायम चर्चेत असते. त्यांना 4 मुले आहेत ज्यांच्याबरोबर ती लॉस एंजेलिसमध्ये राहते.