'सिक्रेट सुपरस्टार'ने अडवली 'गोलमाल अगेन'ची वाट

सिक्रेट सुपरस्टार हा आमीर खानचा सिनेमा, हा अजय देवगनच्या सिनेमाच्या मानाने लो बजेट सिनेमा आहे.

Updated: Oct 21, 2017, 12:11 AM IST
'सिक्रेट सुपरस्टार'ने अडवली 'गोलमाल अगेन'ची वाट title=

मुंबई : आमीर खानच्या सिक्रेट सुपरस्टारने अजय देवगनच्या गोलमान अगेनची वाट अडवली आहे. सिक्रेट सुपरस्टार हा आमीर खानचा सिनेमा, हा अजय देवगनच्या सिनेमाच्या मानाने लो बजेट सिनेमा आहे.

रोहित शेट्टीचा गोलमान अगेन हा बिग बजेट सिनेमा आहे, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालतोय, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा सिनेमा अनेकांना पाहायचा आहे. पण याच वेळी सिक्रेट सुपरस्टार आणि गोलमाल अगेनने आपसात 50-50 टक्के थिएटर वाटून घेतले आहेत.

तेव्हा गोलमाल अगेनला अधिक स्क्रीन पाहिजे होत्या, अशा वेळी सिक्रेट सुपरस्टारने एक पाऊल मागे येणं समजदारीचं ठरलं होतं, पण आमीरचा आगामी सिनेमा येतोय, तो सुद्धा महानायक अमिताभ बच्चनसोबत ठग ऑफ हिंदुस्तान, म्हणून की काय सिक्रेट सुपरस्टार मागे हटायला तयार नाही.