Satish Kaushik Birth Anniversary : दिवंगत अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी गेल्या महिन्यात 67 व्या वर्षी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. त्यांच्या अशा जाण्यानं सगळ्यांना धक्का बसला. आज सतीश कौशिक यांचा वाढदिवस आहे. जरी आज सतीश कौशिक असते तर त्यांनी 67 वा वाढदिवस साजरा केला असता. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सतीश यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणाच्या महेंद्रगड येथे झाला होता. तर 1983 साली त्यांनी ‘मासूम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सतीश कौशिक यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यात ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील ‘कॅलेंडर’ ही भूमिका आहे. त्यासोबत ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातील ‘मुत्तु स्वामी’ ही भूमिका. त्यांची ही भूमिका तर चांगलीच गाजली होती.
सतीश कौशिक यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केला. सतीश कौशिक यांनी 1985 साली लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या मुलाचा जन्म झाला होता. मुलाच्या जन्मानंतर सतीश कौशिक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव शानू असे होते. पण 1990 साली त्यांच्या मुलाचं निधन झालं. मुलाच्या निधनानं त्यांना मोठा धक्का बसला होता. अनेक वर्ष ते या दु: खात होते. दरम्यान, वयाच्या 56 व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून सतीश आणि शशि कौशिक हे पुन्हा एकदा पालक झाले. सतीश कौशिक यांनी जेव्हा वंशिकाच्या जन्माची माहिती दिली होती. तेव्हा त्यातून हे कळाल होती की ते त्यांच्या मुलाच्या निधनाचे वृत्त विसरले नाहीत. आमच्या मुलीचा जन्म झाला. 'एक बाळं असायलं हवी यासाठी आम्ही करत असलेली प्रतिक्षा आणि वेदनादायक प्रतिक्षा अखेर संपली आहे', असं सतीश कौशिक म्हणाले होते. त्यांवेळी त्यांना एक मुलगी झाली असून तिचं नावं वंशिका आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर शशि आणि वंशिकाला खूप मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा : Salman Khan असेल त्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी नियम- अटी लागू; पलक तिवारीचा मोठा खुलासा
दरम्यान, सतीश कौशिक यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर 1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर सतीश कौशिक यांनी जवळपास दीड डजन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर याशिवाय सतीश कौशिक हे एक स्क्रीनप्ले रायटर देखील आहेत.