वाढदिवसाच्या निमित्ताने साराला खास भेट

कमी काळात बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री सारा अली खान आज वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: Aug 12, 2019, 01:33 PM IST
वाढदिवसाच्या निमित्ताने साराला खास भेट title=

मुंबई : कमी काळात बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री सारा अली खान आज वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिग्दर्शक डेविड धवन यांनी साराला एक खास भेट दिली आहे. त्यांनी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आगामी 'कुली नंबर १' चित्रपटाचा पोस्टर रीलिज केला आहे. रविवारी चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती.

'कुली नंबर १' चिपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता वरूण धवण झळकणार आहेत. वरूणने तिला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाचा नवीन पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये "सारा तेरा बर्थडे आया, बर्थडे के दिन मैं तेरे लिए पोस्टर लाया." असे लिहले आहे. कामगार दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच १ मे २०२० मध्ये चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.  

'कुली नंबर १' चित्रपटात करिष्माच्या वडिलांची भूमिका दिग्गज अभिनेते कादर खान यांनी साकारली होती. तर कादर खान यांच्या निधनानंतर 'कुली नंबर १' चित्रपटाच्या सिक्वेस मध्ये जेष्ठ अभिनेते परेश रावल वडिलांच्या भूमिकेला न्याय देणार आहेत. त्यामुळे 'कुली नंबर १' चित्रपटाच्या सिक्वलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.