मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आपला आगामी सिनेमा 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या सिनेमात तिचा को स्टार म्हणून सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. ही अभिनेत्री टीव्हीतील लोकप्रिय शो कॉफी विथ करण सहाव्या सिझनमध्ये आपल्या वडिलांसोबत अभिनेता सैफ अली खानसोबत दिसणार आहे. या शोमध्ये सारा तिच्या खाजगी आयुष्याबाबत अनेक गुपित शेअर करताना दिसत आहे.
या शोच्या प्रोमो व्हिडिओमध्ये करण जोहरने सैफ अली खानला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये असं विचारण्यात आलं की, जर साराचा बॉयफ्रेंड असेल तर तुम्ही त्याला काय प्रश्न विचाराल. तेव्हा सैफ म्हणाला की, मी त्याला त्याची पॉलिटिकल मत आणि ड्रग्सच्या संदर्भात काही प्रश्न विचारायला सांगेन.
तसेच साराला रणवीर कपूरसोबत लग्न करायचं आहे. त्याला डेट नाही तर थेट लग्नासाठी विचारायचं नाही. तसेच तिला कार्तिक आर्यनला डेट करायचं आहे.
#SaifAliKhan breaking #DadStereotypes in style. #KoffeeWithKaran #KoffeeWithSaif #KoffeeWithSara pic.twitter.com/nFU84C0Q0U
— Star World (@StarWorldIndia) November 11, 2018
या शो दरम्यान सारा आणि सैफने एकमेकांचे अनेक गुपितं शेअर केली आहे. तसेच त्यांना एकमेकांबद्दल काय आवडतं ते देखील त्यांनी सांगितलं. सारा लवकरच सिम्बा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.