मुंबई : करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन सुरू झाला आहे. सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान जान्हवी कपूरसोबत या शोमध्ये आली होती. खरंतर या दोन्ही अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी मानल्या जातात आणि दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग आहे. अनेकदा दोघंही एकत्र फिरताना देखील दिसतात.
कॉफी विथ करण सीझनवर नेहमीप्रमाणे करणने त्याच्या पाहुण्यांना अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले. ज्याच्या प्रत्युत्तरात सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी अतिशय अस्पष्ट उत्तरे दिली. प्रश्नोत्तराच्या फेरीत करण जोहरने सारा अली खानला विचारलं, 'तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत फिजिकल रिलेशनमध्ये होतीस की नाही?' या प्रश्नाचं उत्तर साराने खूप मजेशीर पद्धतीने दिलं.
अभिनेत्री म्हणाली, ''कदाचित हो, उत्तर नाही आहे, कदाचित तुम्हाला उत्तर माहित असेल, मी रात्रभर नाते बनवले असेल किंवा, मी अजिबात नाते बनवले नसेल. हे ऐकून करण आणि जान्हवी दोघेही हसू लागले.
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, सारा अली खान अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत आहे परंतु दोघांनीही अद्याप त्यांचं नातं सार्वजनिक केलेलं नाही. लव्ह आज कल २ या चित्रपटादरम्यान त्याची लव्हस्टोरी सुरु झाली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला.