सारा अली खानने ठरवली आहेत तिच्या मुलांची नावे; जाणून घ्या

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची लेक सारा अली खानला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सारा अली खान तिच्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखली जाते आणि ती अनेकदा तिच्या भावना व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही.

Updated: Nov 30, 2023, 07:00 PM IST
सारा अली खानने ठरवली आहेत तिच्या मुलांची नावे; जाणून घ्या  title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची लेक सारा अली खानला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सारा अली खान तिच्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी ओळखली जाते आणि ती अनेकदा तिच्या भावना व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. तिची ही स्टाईल चाहत्यांही प्रचंड आवडते. कायमच सारा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यावेळी सारा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी चर्चेत येण्यामागचं कारण जरा वेगळं आहे. यावेळी साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री तिच्या मुलांचं नाव काय ठेवणार असल्याचं दिसत आहे.

साराला मुलगी झाली तर ती तिचं नाव काय ठेवणार आणि मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवणार. लोकं यावंर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या वर्षी जरा हटके के जरा बच के या चित्रपटात दिसलेली साराचा पुढील चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. २०१८ मध्ये करिअरची सुरुवात केल्यानंतर ती आता चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात आहे. जरी सिनेसृष्टीत दिसत नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. समोर आलेला हा व्हिडीओ आत्ताचा नसून व्हायरल होणारा हा व्हिडीओ जुना आहे. काही महिन्यांआधी सारा अभिनेत्री आणि सेलिब्रिटी शहनाज गिलचा शो देसी वाईब्समध्ये दिसली होती. इन्स्टाग्रावरील व्हायरल होणाऱ्या  व्हिडीओत सारा आपल्या भविष्याची योजनेविषयी बोलताना दिसत आहे. व्हिडीओत सारा आपल्या मुलांसाठी कोणती नावे ठेवणार आहे याबद्दल खुलासा केला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओत शहनाज साराला विचारते की, तु तुझ्या मुलांचं नाव काय ठेवणार? यावंर सारा काहीच विचार न करता उत्तर देते की, कुदसिया. यानंतर शहनाज तिला विचारते की याचा अर्थ काय आहे? यावर सारा म्हणते की, मला माहिती नाही पण मला हे नाव खूप आवडतं. यानंतर शहनाज विचारते की, आणि जर मुलगा झाला तर? यावर सारा म्हणते, 'हिदमत''.  उर्दूमध्ये कुदसियाचा अर्थ होतो पूजनीय आणि हिदमतचा अर्थ होतो वाट दाखवणारा. नेतृत्व करणारा.  सोशल मीडियावर या व्हिडीओला खूप पसंती मिळत आहे. साराचा आगामी सिनेमा ऐ वतन मेरे वतन ओटीटीवर रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या रिलीज डेटची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  तर २०२४ साली तिचे दोन सिनेमा मैट्रो... इन दिनों आणि मर्डर मुबारक. यामध्ये दिसणार आहे.