सारा अली खानचा 'केदारनाथ' सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

काय झालं पुन्हा एकदा 

सारा अली खानचा 'केदारनाथ' सिनेमा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात  title=

मुंबई : सैफ अली खानची मुलगी साराअली खानचा 'केदारनाथ' हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सैफअली खान आणि अमृता सिंहची मुलगी साराअली खानचं बॉलिवूडमध्ये पदार्पण असलेला  ‘केदारनाथ’ हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रेरणा अरोरा यांच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पद्मा फिल्म्सच्या अनिल गुप्ता यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्यांविरोधात १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

याप्रकरणी क्रिआर्ज एन्टरटेन्मेंटविरोधात एफआरआय देखील दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या सिनेमाचं भवितव्य पुन्हा एकदा अधांतरि झालं आहे. या सिनेमाचं शूट सुरु झाल्यापासूनचं हा सिनेमा सातत्यानं वादात सापडला होता. दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि सूशांत सिंह राजपूत यांच्यामध्ये आधी वादाची ठिणगी पडली, कालांतरानं हा वाद मिटला..पण या वादामुळे सिनेमाचं शूट रखडलं होतं. त्यामुळे एकता कपूर आणि अभिषेक सूशांतवर नाराज होते. अखेर नाराज असलेल्या एकतानं या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला.

त्यामुळे पुन्हा एकदा या सिनेमाचं भवितव्य अधांतरि झालं. त्यानंतर नव्या निर्माते या प्रोजेक्टशी जोडल्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. परंतू आता पुन्हा एकदा हा सिनेमा वादात सापडल्यामुळे सिनेमाच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. आता दिग्दर्शक अभिषेक कपूर हा वाद कशा पध्दतीनं हाताळतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल..