दिवाळी पार्टीत सारा अली खान EX बॉयफ्रेंडसोबत

कोण आहे हा वीर? 

Updated: Oct 31, 2019, 10:53 AM IST
दिवाळी पार्टीत सारा अली खान EX बॉयफ्रेंडसोबत  title=

मुंबई : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या नावाची चर्चा होती. पण आता सारा अली खानचं कार्तिकसोबत ब्रेकअप झाल्याचं कळतंय. सारा या अगोदर वीर पहारियाला डेट करत होती. आता पुन्हा सारा आणि वीर एकत्र आल्याचं समजतंय. सारा अली खान आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत दिवाळी पार्टीत दिसली. 

एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अनिल कपूरच्या दिवाळी पार्टीत सारा अली खान आणि वीर पहारिया एकत्र डान्स करताना दिसले. एवढंच नव्हे तर या दोघांनी अमिताभ बच्चनच्या पार्टीला देखील उपस्थिती लावली होती. आणि तिथे देखील धमाल केली. असं म्हटलं जातंय की, सारा आणि वीर जुनं सगळं विसरून त्यांच्यात चक्क मैत्री झाली आहे. सारा अली खान कार्तिक आर्यनला डेट करत आहे तर वीर पहारिया बिझनेसवुमन तहसीन रहीमतुल्लाला डेट करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Diwali 

A post shared by Veer Pahariya (@veerpahariya6) on

सैफ देखील भेटला आहे वीरला 

कॉफी विथ करणच्या कार्यक्रमात गेल्या सिझनमध्ये सारा अली खान वडील सैफ अली खानसोबत आली होती. यावेळी सैफने सांगितलं होतं की, साराच्या बॉयफ्रेंडसोबत मी ड्रिंक केलं आहे. मात्र यानंतर तो रडू लागला होता. 

वीर पहारिया हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेता सुशील कुमार शिंदेंचा नातू आहे. फिल्मफेअरशी बोलताना साराने सांगितलं होतं की, ती फक्त एकदाच रिलेशनशिपमध्ये राहिली आहे. त्याने देखील माझं मन कधीच दुखावलं नाही. पण यानंतर मी कुणालाच डेट केलं नाही. 

दिवाळी पार्टीत सारा अली खान आणि कार्तिक आर्यनसोबतही दिसली. करण जोहरच्या लक्ष्मीपूजन कार्यक्रमात हे कपल एकत्र स्पॉट झाली. सारा अली खान पिवळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसणार आहे.