का आली सपना चौधरीवर म्हशींना अंघोळ घालण्याची वेळ?

हरियाणाची देसी क्वीन सपना चौधरी सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. 

Updated: Aug 30, 2021, 04:35 PM IST
का आली सपना चौधरीवर म्हशींना अंघोळ घालण्याची वेळ? title=

मुंबई : हरियाणाची देसी क्वीन सपना चौधरी सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असते. हरियाणवी गाण्यांवर डांन्स व्हिडिओ व्यतिरीक्त स्टाईलिश फोटोशूटला घेवून सपना कायम चर्चेत असते. सपना चौधरीने आपल्या इंस्टाग्राम अकांऊन्टवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती वीर देसीसोबत म्हैशीला अंघोळ घालताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सपना चौधरी म्हशींना बोलवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये सपना चौधरी म्हशींना बोलवताना म्हणतेय की, ''वीरच तुझं सगळं लागतो तुझी मी कोणीच नाही लागतं ' या दरम्यान जेव्हा सपना चौधरी म्हस जेव्हा सपनाकडे जात नाही तेव्हा तिचा पती वीर म्हणतो की, ''बघ मी बोलावून दाखवतो''वीर जेव्हा म्हशीला अंघोळ घालताना या म्हैशींना तारा आणि माया नावाने आवाज देतो तेव्हा सपना पतीला प्रश्न विचारते की, ''या म्हशी तुमचं सगळं कसं ऐकतात ?'' काय यांचं आपल्यासोबत इंटरनल कनेक्शन आहे का?

यासोबतच वीरचा फोटो क्लिक करण्यासाठी पोज देण्यासाठी सांगते. ज्यावर वीर सपनाला उत्तर देतो की, माणूस आपल्या मूडसाठी हसतो फोटोसाठी नाही. सपना कायमच आपले नवं-नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन प्रेक्षकांची मनं जिंकते.