अभिनेत्री संस्कृती बालगुडे आहे 'या' अभिनेत्याची चाहती

 गेल्या अनेक दिवसांपासून संस्कृती सिनेसृष्टीपासून लांब होती. मात्र लवकरच अभिनेत्रीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

सायली कौलगेकर | Updated: May 5, 2024, 05:11 PM IST
अभिनेत्री संस्कृती बालगुडे आहे 'या' अभिनेत्याची चाहती title=

मुंबई : अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संस्कृती सिनेसृष्टीपासून लांब होती. मात्र लवकरच अभिनेत्रीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतीच संस्कृतीने 'मिरची मराठी' या यूट्यूब चॅनेल मुलाखत दिली. यामध्ये तिने एका अभिनेत्याबाबत खुलासा केला आहे. .

संस्कृतीने दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी विचारण्यात आलं, यावर संस्कृती म्हणाली, ''खऱ्या गोष्टीवर आधारित अशी एक स्पेशल फिल्म पाइपलाइनमध्ये आहे. या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण- वेगळा अनुभव मिळालाय मला या चित्रपटातून. चित्रपटाचं शूटिंग झालंय आणि आता त्याचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. त्याच्याविषयी थोडंसं मीडियामध्येही आलं होतं. कदाचित माझ्यासाठी हा चित्रपट माझं आयुष्य बदलणारा असेल.खऱ्या गोष्टीवर आधारित अशी एक स्पेशल फिल्म पाइपलाइनमध्ये आहे. या चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे. कारण- वेगळा अनुभव मिळालाय मला या चित्रपटातून. चित्रपटाचं शूटिंग झालंय आणि आता त्याचं पोस्ट प्रॉडक्शन सुरू आहे. त्याच्याविषयी थोडंसं मीडियामध्येही आलं होतं. कदाचित माझ्यासाठी हा चित्रपट माझं आयुष्य बदलणारा असेल.''

संस्कृती पुढे म्हणाली, ''अजून एक चित्रपट येतोय आणि मी त्यासाठी खूप उत्साहित आहे. अशा पद्धतीचा चित्रपट मराठीत खूप दिवसांनंतर येतोय. आपण आता हल्लीचे जे चित्रपट बघतो ना त्यापेक्षा हा वेगळा चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही खूप मस्त आहे. या चित्रपटात माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे; ज्याची मी फॅन आहे. आम्ही नंतर मित्र झालो; पण मी अजूनही त्याला सांगत असते की, मी पहिली तुझी फॅन आहे आणि नंतर मैत्रीण आहे.

संस्कृती पुढे म्हणाली, ''तो मित्र म्हणजे सिद्धार्थ मेनन. त्याच्याबरोबर मी या चित्रपटात काम करतेय. आम्ही याआधी 'जून' चित्रपटामध्ये एकत्र काम केलंय; पण ते असं समोरासमोर नाही. माझा सीन दुसरीकडे होता. जेव्हा 'जून' प्रदर्शित झाला, तेव्हा आमची मैत्री झाली. आमचं खूप गोष्टींमध्ये पटतं. मी त्याला 'मॅजिक' म्हणते आणि तो मला ‘गोल्डन गर्ल’ म्हणतो. मी त्याला आधी म्हणायचे की, आपल्याला ना एकत्र असं भारी काम मिळायला पाहिजे; जिथे आपले असे एकत्र सीन असतील आणि ते शेवटी झालंय,'' असंही संसकृती दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.