Sanjay Leela Bhansali On Courtesans : संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'हीरामंडी - द डायमंड बाजार' मागील 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर (Heeramandi) प्रदर्शित झाला. या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा आणि शेखर सुमन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात अनेकदा विश्या किंवा सेक्स वर्कर्सच्या पात्रांचा समावेश असतो. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात काम केलंय. सावरिया, देवदास, गंगुबाई काठियावाडी असो वा आत्ताची हिरामंडी अनेक सिनेमांमध्ये भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी एक वेगळा पैलू जगासमोर मांडला. मात्र, त्यांच्या सिनेमामध्ये अनेकदा सेक्स वर्कर्स (Sex Workers) का असतात? असा सवाल विचारला जातोय. त्यावर खुद्द संजय लीला भन्साळी यांनी उत्तर दिलंय.
काय म्हणाले संजय लीला भन्साळी?
मला वाटतं की या अशा महिला आहेत ज्यांनी स्वतःमध्ये अनेक रहस्ये लपवली आहेत आणि त्यांच्या पात्रांमध्ये अनेक स्तर आहेत. मला त्या शक्तीमध्ये खूप रस आहे, ते कसे गातात, त्यांची वेदना त्यांच्या नृत्यातून आणि गाण्यातून दिसून येतं. त्यांना जगण्याची कला अवगत आहे, त्यांना कलाकुसर अवगत आहे, त्यांना भरतकाम आणि विणकाम माहित आहे आणि ते कोणत्या प्रकारचे दागिने घालतात. ते कलेचे गणिका आहेत. आम्ही काय आहोत? असा सवाल संजय लीला भन्साळी यांनी विचारला.
आम्ही कलाकार आहोत, असं जे म्हणतात.. त्यांना शहाणा माणूस म्हणा. मी असे काहीतरी निर्माण केलं आहे जे स्वतःमध्ये गूढ आहे. मला या चेहऱ्यांचं (वेश्या) खूप आकर्षण आहे, असं संजय लीला भन्साळी म्हणाले आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या वक्तव्यावर तुम्हीही अनेकदा विचार कराल.
आणखी वाचा - संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण
दरम्यान, भन्साळी यांनी या सीरीजच्या माध्यमातून ओटीटीवर डेब्यू केला आहे. भन्साळी म्हटलं आहे की, या सीरीजची आयडिया त्यांना 20 वर्षांपूर्वीच आली होती. प्रत्येक चित्रपटानंतर हीरामंडीचा विचार येत होता. पण हे खूप महाकाय होतं. दोन तासांच्या चित्रपटात हे सर्व बसवणं खूप कठिण होतं. या सीरीजमध्ये अभिनेता फरदीन खान, अध्ययन सुमन, ताहा शाह बहादुर आणि इंद्रेश मलिक यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.