“रोमँटिक वातावरण…” मलायकाच्या त्या व्हिडीओ अर्जुनच्या काकांची प्रतिक्रिया

मलायका आणि अर्जुनच्या खास व्हिडीओची सर्वत्र  चर्चा, अभिनेत्याच्या काकांनी केलेल्या कमेंटमुळे खळबळ  

Updated: Jul 7, 2022, 08:35 AM IST
“रोमँटिक वातावरण…” मलायकाच्या त्या व्हिडीओ अर्जुनच्या काकांची प्रतिक्रिया  title=

मुंबई  : सध्या बॉलिवूडमधील चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. नुसताचं मलायका आणि अर्जुनने पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला. पॅरिसमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले. आता दोघेही भारतात परतले आहेत. तरी सुद्धा मलायकाला पॅरिसचे दिवस आठवत आहेत. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करत मलायकाना अर्जुनसोबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

व्हिडीओ पोस्ट करत मलायकाने कॅप्शनमध्ये 'मुंबईचं वातावरण सध्या रोमांटिक आहे.' मलायकाच्या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनी नाही, तर सेलिब्रिटींनी देखील डोक्यावर घेतलं आहे. मलायकाच्या व्हिडीओवर अर्जुनचे काका संजय कपूर यांनी कमेंट केली आहे. 

अभिनेते संजय कपूर व्हिडीओवर कमेंट करत ‘व्वा व्वा’ म्हणाले आहे. मलायकाच्या व्हिडीओवर फक्त संजय कपूरने नाही, तर पत्नी माहिप कपूरने देखील कमेंट करत प्रेम व्यक्त केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, मलायकाच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. मलायका एका मुलाची आई आहे. मलायकाने अरबाजकडून घटस्फोट घेतला आहे. असं असलं तरीही आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुनला मलायका डेट करतेय.

मलायका आणि अर्जुनने सगळ्या सीमा पारकरुन एकमेकांवर असलेलं प्रेम जगासमोर ठाम मांडलं आहे. मलायका आणि अर्जुनने  2019 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.