धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीशी अमेरिकन एअरलाईन्सकडून गैरवर्तन

अमेरिकन एअरलाईन्सच्या क्रू मेंबरने अत्यंत असभ्य वर्तन केल्याची अभिनेत्रीची तक्रार आहे.

Updated: Feb 20, 2022, 04:19 PM IST
धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीशी अमेरिकन एअरलाईन्सकडून गैरवर्तन title=

मुंबई : 'दिल बेचारा' चित्रपट मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री संजना सांघी नुकतीच एका वाईट विमान कंपनीच्या अनुभवातून गेली. अमेरिकन एअरलाइन्समध्ये प्रवास करत असताना विमानातील क्रू मेंबरने संजनाशी गैरवर्तन केलं. संजनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या घटनेचा उल्लेख केला आणि घडलेल्या प्रकारबद्दल एअरलाईन्सने माफी मागावी अशी मागणी केली.

संजना संघी दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होती त्यासाठी तिने अमेरिकन एअरलाईन्स घेतली होती. या एअरलाइन्सच्या क्रू मेंबरने तिच्याशी गैरवर्तन केल्याची अभिनेत्रीची तक्रार आहे. याबद्दल पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, 'अलीकडेच दिल्ली ते  अमेरिकन एअरलाईन्समधून मी प्रवास केला आणि यादरम्यान एका क्रू मेंबरने माझ्यासोबत अनेक वेळा असभ्य वर्तन केलं. मी आशा करते की, त्या क्रूमेंबरने माझी माफी मागावी जेणेकरुन इतर कोणत्याही प्रवाशाला असा वाईट अनुभव येणार नाही.

संजनाने या पोस्टमध्ये एअरलाईन्स आणि त्यांचे सीईओ डग पार्कर यांनाही टॅग केलं आहे. संजनाने झालेल्या प्रकारावर माफी मागावी अशी मागणी केली आहे.   मात्र अद्यापतरी एअरलाईन्स किंवा त्यांच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती आद‍ित्य रॉय कपूरसोबत एक्शन थ्र‍िलर ड्रामा 'Om: The Battle Within' दिसणार आहे. दिल बेचारा नंतर संजनाचा हा दुसरा सिनेमा आहे.  ज्यामध्ये संजनाने काव्याची भूमिका साकारली होती. हा सिनेमा याच वर्षी रिलीज होणार आहे