मुंबई : अभिनेत्री नेहा धुपियाने आपल्या गरोदरपणाबद्दल नुकतच एक मोठं वक्तव्य केलयं. अभिनेत्री म्हणाली की, गरोदरपणात काम करायचं होतं कारण ब्रेक घेणं आणि नंतर पुन्हा कामावर परतणं या सगळ्यात एवढे प्रॉब्लेम्स येतात की, त्यामुळे मला या सगळ्यातून जायचं नव्हतं. अभिनेत्री म्हणाली की, जर तिने चित्रपट निर्मात्यांना स्त्रीची गर्भधारणा तिची भूमिका म्हणून दाखविण्यास प्रवृत्त केलं तर इंडस्ट्रीत काहीतरी नवीन करण्याची सुरुवात असेल.
अभिनेत्रीने नेहा धुपियाला इंडस्ट्रीत काहीतरी नवं करायची ईच्छा आहे. नेहा आगामी सिनेमा 'ए थर्सडे'मध्ये एका गर्भवती पोलिसाची भूमिका निभावताना दिसू शकते. जेव्हा नेहाने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली तेव्हा ती, पाच महिन्यांची गर्भवती होती. मुलाखतीमध्ये बोलताना नेहाने सांगितलं की, निर्मात्यांनी सुरुवातीला तिला सिनेमात गर्भवती पोलिस म्हणून कास्ट केलं नव्हतं, मात्र जेव्हा त्यांना ही बातमी कळाली तेव्हा तिची गर्भधारणा हळूहळू तिच्या ऑन-स्क्रीन भूमिकेचा एक नवीन भाग बनली.
अभिनेत्रीला हे करायचे होते
नेहा धुपिया म्हणाली की, गरोदर असणं आणि त्यात चित्रपटात भूमिका साकारणं हे खूप रोमांचक होतं. कारण मला तिथे स्वत:ला आणि माझी कमकुवत बाजूला बाहेर ठेवायचं होतं आणि अशाप्रकारे इतर महिला आणि चित्रपट निर्मात्यांना ठळकपणे दाखवायचं होतं की, गर्भवतींसाठी अधिक संधी निर्माण करण्यासाठी प्रेरित करायचं होतं.
नेहा व्यक्त केली भिती
नेहा धुपिया म्हणाली, 'मी याआधीही प्रेग्नंट होते. मेहरच्या काळात मला काम निर्माण करावं लागले. मी माझे स्वतःचे पॉडकास्ट आणि नॉन-फिक्शन टेलिव्हिजन शो केले. मी नेहमीच शेवटपर्यंत काम केलं. मी माझ्या प्रेग्नंसीची घोषणा करण्यापूर्वीच, मी काही प्रोजेक्टचा भाग होते. पण मला त्या प्रोजेक्टमधून काढून टाकलं? होय मी असं केलं. त्यात काही चूक होतं का? शारीरिक बदल होतात आणि मग तुम्ही ते पात्र निभवू इच्छित नाही किंवा ज्या लोकांनी तुम्हाला कामावर ठेवलं आहे त्यांना तुम्ही तसं दिसावं असं वाटत नाही... म्हणून असं झालं!'