Sana Khan अशी काही तोंडावर पडली की चाहत्यांनी उडवली खिल्ली : VIDEO

सना खानचा व्हिडीओ व्हायरल 

Updated: Aug 12, 2021, 08:24 AM IST
Sana Khan अशी काही तोंडावर पडली की चाहत्यांनी उडवली खिल्ली : VIDEO  title=

मुंबई : बॉलिवूडला रामराम ठोकलेल्या अभिनेत्री सना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. सनाने बॉलिवूडला अलविदा म्हटलं असलं तरीही सना खानकडे चाहत्यांचं लक्ष असतं. सध्या सना खान नवरा अनस सैयदसोबत मालदीवमध्ये सुट्टीवर आहे. वॅकेशनचे फोटो पोस्ट करत असलेल्या सनाने एक व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामध्ये ती तोंडावर चांगलीच पडली आहे. 

सना स्विमिंग पूलमध्ये मस्ती करत आहे. यावेळी एका पाण्यात तरंगणाऱ्या बदकावर बसली आहे. यावेळी ती खूप एन्जॉय करत आहे. अनस सैयद या व्हिडीओत दिसत नाही. मात्र त्याचा आवाज आहे. यावेळी सना सगळ्याचा आनंद घेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saiyad Sana Khan (@sanakhaan21)

सना खान तोंडावर पडली 

इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडीओत सना खान तोंडावर पडली आहे. सना खान बदकावर बसून स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहे. पण अचानक मस्ती करताना तिचा तोल जातो आणि तो पाण्यात तोंडावर पडते.

चाहते करतायत मजेदार कमेंट 

त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे शेअर करताना सानाने कमेंटमध्ये लिहिले, 'माझ्या पडण्याची वेळ पहा. अल्लाहचा आशिर्वाद. खूप जोरदार वारा आहे त्यामुळे तो संतुलित करणे खूप कठीण आहे '. जेव्हा सनाने आनंदाने तिचा हा पडणारा व्हिडिओ शेअर केला, तेव्हा चाहते देखील या पोस्टच्या कमेंटमध्ये खूप हसताना दिसत आहेत. प्रत्येकजण हसणाऱ्या इमोजीने सनाची मस्करी करत आहेत.