आराध्या बोलली आणि चर्चा झाली... पाहा बिग बींच्या नातीनं असं काय केलंय?

आराध्या आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये एक गोष्ट सारखी, ज्यामुळे ऐश्वर्याच्या लेकीची होतेय चर्चा   

Updated: Mar 15, 2022, 04:20 PM IST
आराध्या बोलली आणि चर्चा झाली... पाहा बिग बींच्या नातीनं असं काय केलंय? title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून तिची तुलना महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात, आराध्या बच्चन ही हल्ली बरीच चर्चेत असते. मुळात बच्चन कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सातत्यानं प्रकाशझोतात असल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. त्यातच आता आराध्याचीही भर. 

कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा व्हिडिओ येताच व्हायरल होतोच. मात्र, यावेळी या कुटुंबातील सगळ्यात छोटी तरुण सदस्य आराध्या बच्चन देखील खूप लोकप्रिय आहे. 

व्हिडीओमध्ये आराध्या हिंदी बोलताना दिसत आहे. आराध्याचं हिंदी भाषेवर प्रभुत्त्व पाहून तिची तुलना बिग बींसोबत होत आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आराध्या अवघ्या 10 वर्षांची आहे आणि आतापासून सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग भरपूर आहे. आतापासून आराध्याचे एक नाही तर शेकडो फॅनपेज आहेत.

आराध्याचा हा पहिला व्हिडिओ नाहीये. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याआधीही आराध्याचे अनेक डान्स व्हिडिओ आणि अनेक स्पीच व्हिडिओंनीही चाहत्यांची मने जिंकली आहेत.