चर्चेत असतात हे कपल; काहींनी दिली प्रेमाची कबुली, तर काहींनी मात्र

हे कपल कायम चाहत्यांना देतात कपल गोल्स 

Updated: Sep 7, 2021, 09:02 AM IST
चर्चेत असतात हे कपल; काहींनी दिली प्रेमाची कबुली, तर काहींनी मात्र  title=

मुंबई : कलाविश्वात कलाकार त्यांच्या कामामुळे कमी तर त्यांच्या रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत असतात. अशात सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे बॉलिवूड कपल कायम कपल चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. नात्यांच्या या खेळात अनेकांनी सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देली. तर काही मात्र आपल रिलेशनशिप गुपित ठेवलं आहे आणि या नात्याला चांगल्या मैत्रीचं नाव दिलं आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगत असते. 

अभिनेत्री दिशा पाटनी - अभिनेता टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ- दिशा पटानीच्या नात्याला ग्रहण

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध जोड्यांपैकी एक म्हणजे दिशा-टायगर. 'बागी 2' चित्रपटात स्क्रिन शेअर केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉट केलं जात. पण दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा अद्याप केलेला नाही. दोघे एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. 

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्य़ाबद्दल कायम गुपित ठेवते. पण कॅमेऱ्यापासून दूर जाणं सहज शक्य नसतं.  दोघे लवकरचं लग्न करतील अशी चर्चा देखील रंगत आहे. 

अभिनेता विद्यूत जामवाल आणि नंदिता महतानी 

विद्यूत आणि नंदिताने गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. जानेवारी महिन्यात नंदिताने नात्याची कबुली दिली. सुरूवातीला त्यांनी नात्याबद्दल गुपित ठेवलं. पण अखेर त्यांच्या नात्याबद्दल सर्वांना कळालं आहे. नंदिता, अभिनेत्री करिष्मा कपूरचा पहिला पती संजय कपूरची पहिली पत्नी आहे. 

अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा

कियाराचं जीवनातील नेमकं स्थान काय, सांगतोय Rumoured बॉयफ्रेंड सिद्धार्थ
कियारा आणि सिद्धार्थमध्ये असलेली केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांनी 'शेरशाह' चित्रपटाच्या माध्यमातून पाहिली. दोघांना त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा विचारण्यात आलं, पण दोघांनी या प्रश्नावर होकार देखील दिला नाही आणि नकार देखील दिला नाही.