Shehnaaz Gill मुंबई सोडून पंजाबला होणार शिफ्ट?

 आजकाल शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Bollywood Life | Updated: Oct 11, 2021, 06:21 PM IST
Shehnaaz Gill मुंबई सोडून पंजाबला होणार शिफ्ट? title=

मुंबई : आजकाल शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे असा दावा केला जात आहे की शहनाज गिलनं ठरवलं आहे की, ती कायमची मुंबई सोडत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या मागचं सत्य काय आहे ते सांगणार आहोत.

आजकाल शहनाज गिलचा एक व्हिडिओ यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर तिच्या सगळ्याच फॅन्सना शहनाज गिलची खूप काळजी वाटत आहे. शहनाज गिलच्या आयुष्यात सिद्धार्थ शुक्लाचं काय महत्त्व आहे? हे कदाचित कोणालाही सांगण्याची गरज नाही.

शहनाज गिलच्या एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो सोशल मीडियावर अशा प्रकारे व्हायरल होत आहे की, शहनाज गिलने कायमची मुंबई शहर सोडण्याची योजना आखली आहे, मात्र ही फक्त एक अफवा आहे. यामध्ये कोणतीही सत्यता नाही. शहनाज गिल 7 ऑक्टोबरपासून तिच्या कामावर परतली आहे आणि आजकाल ती तिच्या 'हौसला रख' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. शहनाज गिलचा हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.