'तु तुझ्या कुत्रे आणि मांजरीसबोत एकटीच मरशील' असं सामंथाला कोण म्हणालं?

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनय आणि फॅशनशिवाय ट्रोलला जबरदस्त उत्तरे देण्यासाठी ओळखली जाते. 

Updated: May 27, 2022, 09:29 PM IST
'तु तुझ्या कुत्रे आणि मांजरीसबोत एकटीच मरशील' असं सामंथाला कोण म्हणालं? title=

मुंबई : साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनय आणि फॅशनशिवाय ट्रोलला जबरदस्त उत्तरे देण्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा घटस्फोट झाल्यापासून नेटिझन्स तिला रोज ट्रोल करत असतात. अलीकडेच 'पुष्पा' फेम अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केली आहे. 

खंरतर, ट्विटर हँडलवर समंथा रुथ प्रभूला ट्रोल करणाऱ्या एका ट्रोलरने तिला वाईटरित्या ट्रोल केलं. सामंथाच्या एका पोस्टवर कमेंट करत, ट्रोलर म्हणाला, "तु तुझ्या कुत्रे आणि मांजरींसह एकटीच मरशील." यावर समंथाने उत्तर देत म्हटलं की, मी स्वतःला भाग्यवान समजेन. समांथाच्या या जबरदस्त उत्तरानंतर ट्रोलर्सने त्याचं ट्विट डिलीट केलं.

सामंथा रुथ प्रभू हिने 2017 मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. याआधी, त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं होतं आणि साऊथ इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडप्यांच्या यादीत देखील त्यांचा समावेश होता. मात्र 2 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने लाखो लोकांची हृदयं तुटली.

समंथा आणि चैतन्य यांनी त्यांच्या विभक्त होण्याचं कारण अद्याप उघड केलेलं नाही. मात्र, रिपोर्ट्सनुसार, अक्किनेनी कुटुंब समंथाच्या चित्रपटांमधील बोल्ड लूकवर खूश नव्हते. म्हणून तिने नागा चैतन्यपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.