सलमान या अभिनेत्रीमुळे आजही अविवाहीत, मारतो तिला टोमणे

सलमान कोणामुळे आजही सिंगल...

Updated: Jun 9, 2018, 04:04 PM IST
सलमान या अभिनेत्रीमुळे आजही अविवाहीत, मारतो तिला टोमणे title=

मुंबई : काही दिवसांपूर्वीच सलमान ख़ान रेस-3 च्या प्रमोशनसाठी महबूब स्टूडियोमध्ये पोहोचला तर त्याला भेटण्य़ासाठी तेथे कॅटरीना देखील पोहोचली. पण कॅटरीनाला पाहताच सलमानने असं काही केलं की ती हैराण झाली. सलमानने कॅटरीनाला विचारलं की, 15 जूनला एकीकडे रेस-3 रिलीज होणार आहे तर दुसरीकडे 29 जूनला तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड रणबीर कपूरचा संजू सिनेमा रिलीज होणार आहे यावेळी तु कोणाला सपोर्ट करणार आहे. सलमानकडून ही गोष्ट ऐकल्यानंतर कॅटरीनाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला.

कॅटरीनाला या गोष्टीची कल्पना नव्हती की, सलमान आजही रणबीरचा विषय काढेल. ही गोष्ट तिला इतकी खटतली की ती लगेच तेथून निघून गेली. रणबीरबाबत कॅटरिनाला याआधीही सलमानने टोमणे दिले आहेत. काही वर्षांपूर्वी कॅटरीना जेव्हा सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नात आली होती तेव्हा देखील सलमानने म्हटलं की, मी कॅटरिनाला मिसेस खान बनण्याची संधी दिली होती. कॅटरिनाच त्याला सोडून निघून गेली. त्यावेळी कॅटरीना कॅफ आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये होते. तेव्हा सलमान म्हणायचा की त्याला या रिलेशनशिपबद्दल काहीच अडचण नाही.

सलमान जेव्हा रणबीरबाबत कॅटरीनाला टोमणे मारतो तेव्हा ते आजुबाजुंच्या लोकांना देखील ते लक्षात येतं. पण आता कॅटरीनाच्या लाईफमधून रणबीर निघून गेला आहे आणि याला 2 वर्ष होत आले आहेत. कॅटरीना पुन्हा एकदा सलमानच्या जवळ आली आहे.