सलमान खान आणि शहनाज गिलमध्ये वाद; अभिनेत्रीला सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता

शहनाज गिल तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. 

Updated: Aug 8, 2022, 03:39 PM IST
 सलमान खान आणि शहनाज गिलमध्ये वाद; अभिनेत्रीला सिनेमातून दाखवला बाहेरचा रस्ता title=

मुंबई : शहनाज गिल तिच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. अभिनेत्रीच्या चाहत्यांनाही तिचा अभिनय बॉलिवूड चित्रपटात पाहायचा होता. पण आता समोर आलेली बातमी जाणून तुमचंही हृदय तुटू शकतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहनाज गिलचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न भंगलं आहे.

ही बातमी टेलीचक्करच्य अधिकृत इन्स्टा हँडलवरून शेअर करण्यात आली आहे. ही बातमी शेअर करत लिहिलं आहे की, 'शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटातून बाहेर पडली आहे. अभिनेत्रीने त्याला सोशल मीडियावर अनफॉलोही केलं आहे.

सलमानने केलं सिनेमातून बाहेर?
शहनाज गिलबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, शहनाज 'कभी ईद कभी दिवाली'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाज गिलला ही संधी बॉलीवूडच्या भाईजानने म्हणजेच सलमान खानने दिली होती. पण आता सलमान खानने ही संधी तिच्याकडून हिसकावून घेतल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आता वेगळ्याच गोष्टी सांगत आहेत. चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की, या दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे, जे इतक्या वाईटरित्या झालं. मात्र, शहनाजला चित्रपटातून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

शहनाजने केलं अनफॉलो
शहनाज गिलचे अनेक व्हिडिओही समोर आले होते, ज्यामध्ये ती चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर दिसली होती. रिपोर्ट्सनुसार, शहनाजला सलमान खानचा मेव्हणा म्हणजेच आयुष शर्माच्या विरुद्ध कास्ट करण्यात आला होतं. मात्र आता ती या चित्रपटात दिसणार नाही आणि याचा राग आल्यानंतरच तिने सलमान खानला अनफॉलो केलं असावं, असं दिसतं. पण चाहत्यांनी घाबरण्याची गरज नाही कारण शहनाजच्या हातात अजूनही बॉलीवूड चित्रपट आहे.

सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माती रिया कपूरच्या पुढील चित्रपटात शहनाज गिलचाही चित्रपट असेल. हा चित्रपट साइन झाला असून लवकरच शहनाज त्याच्या शूटिंगसाठी परदेशात रवाना होणार असल्याचं वृत्त आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर देखील असणार आहेत. आता शहनाजचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही हे पाहावं लागेल.