मुंबई : सुपरस्टार सलमान खान (Salman Khan)त्याच्या प्रोफेशनल लाईफ एवढाच त्याच्या पर्सनल आयुष्यातही खूप चर्चेत आहे. आज भाईजान त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करतोय. सलमान त्याच्या लव्हलाईफमुळेही कायम चर्चेत असतो. त्याने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण आता आम्ही तुम्हाला सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली (Somy Ali) बद्दल सांगणार आहोत. ज्यात सलमानने ईशारा ईशाऱ्यात सलमानवर मारहाण आणि सिगरेटचे चटके दिल्याचे आरोप लावले होते.
सोमी अली पाकिस्तानात राहत होती, पण सलमान खानसाठी ती मुंबईत आली. येथे आल्यानंतर सोमी अलीनं सलमानसोबत एक चित्रपटही केला आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करू लागले. सोमी अली आणि सलमान हे 1991 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले आणि 1998 मध्ये त्यांचा ब्रेकअप झालं.
सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी पुन्हा फ्लोरिडाला गेली आणि एनजीओ चालवू लागली. काही दिवसांपुर्वी सोमी अलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने म्हटलं की, ''भारतात माझ्यावर बंदी आणली आणि नंतर मला खटला दाखल करण्याची धमकी दिली. तू एक घाबरट व्यक्ती आहेस, तुझ्या वकिलांना काढून टाक. माझ्या संरक्षणासाठी माझ्याकडे 50 वकील आहेत.
तू जे माझं अनेक वर्षे माझं शारीरिक शोषण केलंस, मला सिगारेटनं चटके दिलेस. जे लोकं तुझ्या समर्थन करतात त्यांना लाज वाटली पाहिजे, जे एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करतात. मात्र, ही पोस्ट सोमीने लगेच डिलीट केली. याआधीही सोमीने सलमानविरोधात अनेकदा आवाज उठवला होता.
या पोस्टमध्ये सोमीनं काही अपशब्दही वापरले आहेत. यासोबतच त्या अभिनेत्रींनाही टार्गेट करण्यात आलं आहे. ज्या सलमानला सपोर्ट करत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सोमी अली एकेकाळी स्वत:ला सलमान खानची मोठी फॅन म्हणायची आणि आज ती त्याच्यावर आरोप करत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत सोमीने सलमानसोबतच्या ब्रेकअपचं कारणही सांगितलं होतं. त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगत सलमाननं तिची फसवणूक केल्याचं सांगितलं. याआधीही सोमीने सलमानविरोधात अनेकदा आवाज उठवला होता.
सलमान खान आणि सोमी अलीचं नातं ९० च्या दशकात सुरू झाल्याचं बोललं जातं. सलमान आणि सोमी जवळपास 8 वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. सलमान खान आणि संगीता बिजलानी यांचं लग्नही सोमी अलीमुळेच मोडलं, असा दावाही अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. कारण लग्नाआधीच संगीताला सुगावा लागला होता की सलमानची सोमीसोबतची जवळीक वाढू लागली आहे.