Salman Khan : सलमान पुन्हा Shirtless...सोशल मीडियावर Photo Viral

Updated: Oct 27, 2022, 10:16 AM IST

Salman_Khan_Shirtless

Salman Khan Shirtless Photos : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान (Bollywood actor Salman Khan) याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. भाईजानची कुठलीही गोष्ट असो ती लगेचच सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होते. सलमान खानला डेंग्यू (Dengue) झाला होता. आता तो बरा झाला आहे की, तो मेव्हणा आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या (Yush Sharmas Birthday) पार्टीत दिसून आला. जेव्हा पिक्चरमध्ये सल्लूमियाँ शर्ट काढतो तेव्हा चाहते वेडे होतात. पण सोशल मीडियावर सल्लूमियाँचा Shirtless फोटो व्हायरल होतो आहे. सलमान खान पुन्हा एकदा Shirtless झाला आहे. 

सोशल मीडियावर फोटो केला शेअर 

26 ऑक्टोबरला देशभरात भाऊबीज (Bhai Dooj) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिवाळीचा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. सल्लूमियाँनेही इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर स्वतःचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सल्लू मियाँ पुन्हा एकदा शर्टलेस पोज देताना दिसत आहेत. या फोटोमध्ये भाईजान सिक्स पॅक फ्लॉंट (six pack Flaunt) करत आहे आणि काळा गॉगल घालून स्टायलिश पोझ देत आहेत. (Salman Khan Shirtless Photo on instagram nmp)

चाहत्यांना लागलं वेड

भाईजानचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोला यूजर्स हार्ट आणि लव इमोजी शेअर करत आहेत. सलमान खान लवकरच 'टायगर 3' (Tiger 3) मध्ये कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) दिसणार आहे.