Salman Khan's Step Mother Helen : बॉलिवूडचे लोकप्रिय लेखक सलीम खान यांनी विवाहीत असतानाही 1981 साली अभिनेत्री हेलन यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांच फक्त आधी लग्न झालं नव्हतं तर त्याशिवाय त्यांना चार मुलं देखील होती. त्या चार मुलांची नावं ही सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा खान अशी आहेत. अशा परिस्थितीत सलीम यांच्या कुटुंबात कसं वातावरण असेल त्यांच्यात ठिणगी उडाली असेलच अशा अनेक चर्चा सुरु होत्या. इतक्या वर्षांनंतर आता अभिनेता अरबाज खान त्याच्या कुटुंबाविषयी बोलला आहे. सलीम यांनी कधीच अपेक्षा केली नाही की सलमान, अरबाज आणि सोहेल हेलन यांना त्यांच्या आईचा दर्जा देतील. तर आज हेलन या त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आहेत.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अरबाजनं हेलन यांच्याविषयी बोलता अनेक गोष्टी सांगितल्या. तेव्हा याविषयी बोलत अरबाज म्हणाला, हेलेन काकूनं कधीच आम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे तो म्हणाला की, 'त्यांना माहित होतं की या मुलांसाठी त्यांची आई खूप महत्त्वाची आहे. त्यांनी कधीच आम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना फक्त या गोष्टीचा आनंद होता की त्यांच्या आयुष्यात कोणी आहे आणि तो त्यांच्यासोबत राहणार. त्यांना माहित होतं की त्या व्यक्तीला त्याचं कुटुंब, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं आहेत आणि त्यांना थोडाही त्रास होईल असं त्यांना काही करायचं नव्हतं.'
अरबाज खाननं पुढे सांगितलं की 'आईसाठी हे खूप कठीण होतं, पण दुसऱ्या गोष्टींमुळे ती स्वत: ला सांभाळू शकली. उदा. त्यांची मुलं आणि त्यांची परिस्थिती जी होती. त्यांनी आम्हाला खूप कष्ट करून मोठं केले होते. त्यानंतर त्यांना एकत्र राहण्याची संधी मिळाली होती. त्यांनी हे सगळं पाहिलं आहे. तर आज आम्ही सगळे एकत्र आहोत.'
हेही वाचा : दिशा वकानीचा फक्त भाऊ नाही तर वडिलांनीही केलय Taarak Mehta मालिकेत काम, तुम्हाला आठवतोय का 'तो' कलाकार?
अरबाज म्हणाला 'त्याच्या वडिलांना त्याच्या आईचा हाथ धरून बराचवेळा बसून तासनतास घालवायचे आहेत. त्यांना हे आवडतं. माझे वडील आजही आईचा हाथ धरून बसतात आणि ते पाहायला खूप छान वाटतं. आमच्या वडिलांनी देखील कधीच आम्ही हेलेन काकूंना एक्सेप्ट करावे असे आम्हाला सांगितले नाही. कारण त्यांना माहित होतं की या मुलांसाठी त्यांची आई खूप महत्त्वाची आहे.' अरबाजच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी 'तणाव'मध्ये दिसला होता