'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन?

Singham 3 Salman Khan : 'सिंघम अगेन' या चित्रपटात होणार 'चुलबुल पांडे' ची एण्ट्री...

दिक्षा पाटील | Updated: Sep 19, 2024, 04:57 PM IST
'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन? title=
(Photo Credit : Social Media)

Singham 3 Salman Khan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण लवकरच 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. अजयची सगळ्यांच्या लक्षात राहिलेली बाजीराव सिंघम या भूमिकेला आता 10 वर्ष झाली आहेत. आता त्याचा 'सिंघम 3' हा चित्रपट येत आहे. रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील 'सिम्बा' आणि 'सूर्यवंशी' या चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. या चित्रपटात अनेक बडे कलाकार पाहायला मिळणार आहे. 

'सिंघम 3' च्या स्टारकास्टविषयी बोलायचं झालं तर यात दीपिका पदुकोण ही 'लेडी सिंघम' च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून ती रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये एन्ट्री घेणार आहे. तर करीना कपूर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटात दिसणार आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. 'टाइम्स नाओ'च्या रिपोर्टनुसार, सलमान खान 'सिंघम 3' मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या या फ्रेंचायझीमध्ये सलमान हा त्याच्या 'दबंग' फ्रैंचायझीच्या सुपरहिट कॉप, चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'दबंग' फ्रेंचायझीमध्ये सलमान हा चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. खरंतर त्याचे दोन्ही 'दबंग' आणि 'दबंग 2' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत मात्र त्याचा तिसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. पण जर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा चुलबूल पांडेची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे. 

रिपोर्टमध्ये एका सूत्रानं दिलेल्या बातमीनं सांगितलं की रोहित शेट्टीनं सलमानला एक खास पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी तयार केलं. सलमाननं रोहितच्या रिक्वेस्टसाठी मोठं मन केलं आहे आणि त्यानं त्या भूमिकेसाठी मानधन देखील घेतलेलं नाही. अर्थात 1 रुपयाही घेतला नाही. 

हेही वाचा : Emergency च्या प्रदर्शनाआधी पाकिस्तानमध्ये कंगना रणौतचीच चर्चा? एकदा तुम्हीही 'हा' VIDEO पाहाच

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या एका रिपोर्ट्नुसार, 'सिंघम 3' निर्मात्यांनी त्यांच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख ही पुढे ढकलले नाही. तर ते 1 नोव्हेंबर रोजीच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.