मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसाठी सलमान ठरू शकतो 'Unlucky'

मानुषी छिल्लरने जगभरात आपल्या देशाचा नाव रोशन केलं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 1, 2017, 02:13 PM IST
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसाठी सलमान ठरू शकतो 'Unlucky' title=

मुंबई : मानुषी छिल्लरने जगभरात आपल्या देशाचा नाव रोशन केलं आहे. 

मानुषीने २०१७ चे मिस वर्ल्ड हे किताब आपल्या नावे करून घेतलं आहे. खास गोष्ट ही आहे की मानुषीने तब्बल १७ वर्षानंतर भारताकडे विश्व सुंदरीचा किताब जिंकला आहे. विश्वसुंदरी असो वा ब्रम्हांड सुंदरी त्यांच लक्ष्य हे बॉलिवूडमध्ये करिअर करणं असू दे. 

एवढंच नाही तर अशी चर्चा आहे की, मानुषी छिल्लर सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. गेल्या काही वेळेपासून आपण पाहतो की सलमान खान अनेक नव्या सिताऱ्यांना लाँच करत आहे. पण याबरोबर सलमान खानसोबत आणखी एक गोष्ट जोडलेली आहे आणि ती म्हणजे सलमान खान ज्यांना करिअर सुरू करून देतात त्यांचं करिअर फार लांब चालत नाही. 

काय आहे कारण?

आणि याची अनेक उदाहरण आहेत. सलमान खानने कुणाला लाँच केलं असेल किंवा त्याच्यासोबत कुणी डेब्यू केलं असेल त्या व्यक्तीचं करिअर फार चांगल राहिलेलं नाही. सोनाक्षी सिन्हा (दबंग), नगमा (बागी) आणि रवीना टंडन (पत्थर के फूल) सारख्या अपवादांना सोडलं तर सलमान सोबत करिअर सुरू करणाऱ्या अभिनेत्री फार काळ टिकल्या नाहीत. याचे उदाहरण आहे मैंने प्यार कियामधली भाग्यश्री, सनम बेवफामधील चांदनी, लवमधील रेवती आणि तेरे नाम या लोकप्रिय सिनेमातील भूमिका चावला. या अभिनेत्री वन टाइम वंडर ठरल्या. या अभिनेत्री सलमान खानसोबत आल्या पहिला सिनेमा हिट झाला मात्र त्यानंतर त्यांच करिअर थांबल असंच पाहायला मिळालं आहे. 

या अभिनेत्रींना सलमान खानने रोल दिला मात्र त्यानंतर आज त्या बॉलिवूडमध्ये छोटे मोठे रोल करताना दिसत आहे. याचं उदाहरण आहे कतरिना कैफ सारखी दिसणारी जरीन खान. जरीन खान सध्या अभिनयापेक्षा आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. तसेच ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसणारी सेन्हा उल्लार हिला देखील सलमानने लाँच केलं होतं. मात्र आता ती बॉलिवूडमध्ये देखील कुठे लांब लांब पर्यंत राहिलेली नाही. बॉडीगार्ड या सिनेमातून देखील पदार्पण करणारी परदेशी अभिनेत्री हसीना हेजल देखील युवराजसोबत लग्न करून हिट झाली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत मानुषी सलमानसोबत लाँच होणार ही आनंदाची बाब असली तरीही चिंतेची गोष्ट आहे हे नक्की