एकीकडे विकी-कतरिनाचं लग्न तर दुसरीकडे सलमानसोबत व्हायरल होणारी मुलगी कोण?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. 

Updated: Dec 7, 2021, 09:30 PM IST
एकीकडे विकी-कतरिनाचं लग्न तर दुसरीकडे सलमानसोबत व्हायरल होणारी मुलगी कोण?  title=

मुंबई : चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. जगभरात सलमान खानचे करोडो चाहते आहेत, जे त्याच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. सलमानशी संबंधित कोणतीही पोस्ट असली तरी ती सोशल मीडियावर लगेच व्हायरल होवू लागते. या क्रमात, सलमान खानचा एक थ्रोबॅक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो एअरफोर्सच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी आहे, जो पाहिल्यानंतर चाहते देखील गोंधळून गेले आहेत. की ही मुलगी नेमकी आहे तरी कोण!

हा फोटो व्हायरल भयानीच्या अधिकृत इन्स्टा पेज बॉलीवूड पॅपवर शेअर करण्यात आला आहे. फोटोमध्ये एक मुलगी सलमानला पकडून फोटो काढत असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये सलमानही खूप खुश दिसत आहे. या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हा फोटो पाहून चाहते या सुंदर मुलीचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या पोस्टवर सोशल मीडिया युजर्सच्या काही प्रतिक्रिया येत आहेत. फोटोवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की, 'हा 2013 चा जुना फोटो आहे', तर दुसऱ्या यूजरने लिहिलं आहे की, 'आमच्या कतरिनासोबत इतके आनंदी कधीच पाहिलं नाही'. त्याचबरोबर काही लोकं या फोटोला फेक देखील म्हणत आहेत. सलमान खानबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो बिग बॉस 15 होस्ट करताना दिसत आहे. हा अभिनेता शेवटचा राधेमध्ये दिसला होता, तर टायगर 3 हा त्याचा आगामी चित्रपट आहे.