'Salman Khan ची पूजा करणे बंद करा तो मानसिक आजारी आहे'; सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक दावा

सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव न घेता बॉलिवूड अभिनेत्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत.

Updated: Oct 1, 2022, 09:44 PM IST
'Salman Khan ची पूजा करणे बंद करा तो मानसिक आजारी आहे'; सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक दावा title=

मुंबई : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव न घेता बॉलिवूड अभिनेत्यावर आरोप केले आहेत. सोमी अलीने गेल्या काहि दिवसांपुर्वी तिच्या इंस्टाग्रामवर सलमानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटाचे पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये भाग्यश्रीही सलमान खानसोबत दिसत आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, ''हा माणूस महिलांना मारहाण करतो. यात फक्त मलाच नाही तर अनेक महिलांना मारहाण झाली आहे. कृपया त्याची पूजा करणं थांबवा. तो मानसिक आजारी आहे."

सोमी अलीने ही पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली होती. ज्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली होती ते व्हेरिफाय नसलं असलं तरी ते सोमीचं खरं इन्स्टा खातं असल्याचं बोललं जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोमीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. यासोबतच कमेंट्सही मर्यादित ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच, प्रत्येकजण त्याच्या पोस्टवर कमेंट करू शकत नाही. ही पोस्ट समोर आल्यानंतर यावेळीही सलमानचं नाव न घेता त्याच्यावर  गंभीर आरोप  केले आहेत.

याआधीही सोमीने 'दबंग' चित्रपटाच्या अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्याने यावर्षी मार्चमध्ये सलमानवर महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. 'मैने प्यार किया' चित्रपटाचे पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर करत सोमीने सलमानवर निशाणा साधला आणि ऐश्वर्या राय बच्चनलाही टॅग केलं.

"बॉलिवूडचा हार्वे वेनस्टीन. आपण उघड होईल. ज्या महिलांचं तुम्ही शोषण केलं त्या एक दिवस नक्कीच जगासमोर येतील आणि सत्य सर्वांसमोर येईल. ऐश्वर्या रायसोबत आलेल्या व्यक्तीप्रमाणे." अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, रिलेशनशिपदरम्यान सलमान खानने सेटवर ऐश्वर्या रायला मारहाण केली होती. सलमान तिच्यावर वर्चस्व गाजवत असे.  

विवेक ओबेरॉयसोबत बाचाबाची झाल्यावर सलमान खानचा रागही पाहायला मिळाला. असं म्हटलं जातं की, ऐश्वर्याने रागाच्याभरात  सलमानच्या तिच्यासोबतचं नातं तोडलं.