पनवेलच्या रस्त्यावर Salman झाला रिक्षावाला, सर्पदंशानंतर एकटाच कुठे निघाला?

Salman Khan Drives Auto Rickshaw : सलमान खान बचावला

Updated: Dec 29, 2021, 05:15 PM IST
पनवेलच्या रस्त्यावर Salman झाला रिक्षावाला, सर्पदंशानंतर एकटाच कुठे निघाला? title=

मुंबई : सध्या सलमान खान ( Salman Khan)  पनवेलच्या फार्म हाऊसमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सलमान तेथे न्यू इयर सेलिब्रेशनही करणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, सलमान खान नुकताच रात्री पनवेलजवळील एका ठिकाणी फिरायला गेला होता आणि यादरम्यान तो ऑटो रिक्षा चालवतानाही दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खान निळ्या रंगाचा टी-शर्ट, पांढरी शॉर्ट्स आणि कॅपमध्ये ऑटो रिक्षा चालवताना दिसला.

या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.  हा व्हिडिओ अगदी काही सेकंदांचा आहे. ज्यात सलमान खान स्पष्टपणे दिसत आहे. मंगळवारी भाईजान अशाच पद्धतीने पनवेलमध्ये स्पॉट झाल्याचे बोलले जात आहे.

सलमान खान बचावला

ख्रिसमसच्या आधीच सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर पोहोचला होता. जिथे त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते. 27 डिसेंबरला सलमान खाननेही आपला वाढदिवस तिथे साजरा केला, मात्र वाढदिवसाच्या एक दिवस आधी सलमान खानला साप चावल्याची बातमी येताच त्याने सगळ्यांना घाबरवले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 हा साप फार्म हाऊसच्या एका खोलीत घुसला आणि सलमान खानला चावला. या सापाने सलमानला तीनदा चावा घेतल, पण सुदैवाने तो सार विषारी नसल्यामुळे आणि तात्काळ उपचार मिळाल्याने सलमान खान मोठ्या धोक्यातून बचावला.

वाढदिवसाच्या रात्री त्याने स्वतः मीडियासमोर येऊन हा संपूर्ण किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला. त्याचवेळी, त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सेलिब्रिटी सामील झाले होते आणि रात्री उशिरापर्यंत हे सेलिब्रेशन सुरू होते.

त्यानंतर काल रात्री तो पनवेलच्या बाजारपेठेत फिरताना दिसला आणि त्याची ही स्टाईल चाहत्यांनी कॅमेऱ्यात कैद केली.