मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या लग्नाची त्याचे चाहत्यांना अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. रिअॅलिटी शो असो किंवा इतर कोणताही इव्हेंट सगळीकडे सलमान खानला त्याच्या लग्नाबद्दलच विचारलं जातं. मात्र आता तो दिवस दूर नाही जेव्हा सलमान खानच्या घरी पुन्हा एकदा लग्नाची गडबड सुरू होणार आहे.
मात्र ही लग्नाची गडबड सलमानसाठी नाही तर त्याचा भाऊ अरबाज खानसाठी आहे. अरबाज खान पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. मलायकाकडून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खानने हे कबुल केलं होतं की, त्याच्या आयुष्यात आणखी एका व्यक्तीने एन्ट्री केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आपल्या एक्स पत्नीकडून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता आणि फिल्ममेकर अरबाज खान पुन्हा एकदा लग्नाचा विचार करत आहे. तो लवकरच गर्लफ्रेंड आणि मॉडेल Georgia Andriani सोबत सात फेरे घेणार आहे. मात्र या कोणत्याच गोष्टीवर अरबाज किंवा त्याची फॅमिली काहीही सांगत नाही. मात्र अरबाज अनेकदा जॉर्जियोला लपून छपून भेटत आहे.