सलमान-धर्मेंद्र यांचा 'जमाल कुडू' गाण्यावर धमाल डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

समोर आलेल्या आपण व्हिडीओत आपण पाहू शकतो की, बॉलिवूडच्या दोन दिग्गज कलाकारांनी बॉबी देओलच्या सुपरहिट गाण्याची सिग्नेचर स्टेप केली आहे. जी पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. तुम्ही पाहू शकता की, कश्या प्रकारे सलमान आणि धर्मेंद त्याच्या डोक्यावर काचेचं ग्लास ठेवून डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated: Jan 1, 2024, 12:50 PM IST
सलमान-धर्मेंद्र यांचा 'जमाल कुडू' गाण्यावर धमाल डान्स; व्हिडीओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू title=

मुंबई : टीव्हीचा सगळ्यात चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. सध्या  'बिग बॉस 17' खूप चर्चेत आहे. लोकांची या शो खूप पसंती मिळत आहे. तर न्यू ईयरच्या निमीत्ताने सलमान खानने त्याच्या शोवर आलेल्या पाहुण्यांच जोमात स्वागत केलं. ज्यांच्यासोबत तो धमाल मस्ती करतानाही दिसला. 

सलमान खान आणि धर्मेंद्रने रिक्रिएट केला Bobby Deol ची 'जमाल कुडू' डांन्स स्टेप
नुकताच शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये सलमान खान धर्मेंद्रसोबत बॉबी देओलची  'जमाल कुडू' डान्स स्टेप रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, एनिमलमध्ये बॉबी देओलच्या एन्ट्रीचं गाणं आणि सिग्नेचर स्टेप चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल होत आहे. ज्याचे आजवर अनेकांनी रिल्सही बनवले आहेत.

व्हिडीओ पाहून तुम्हीलाही आवरणार नाही हसू
समोर आलेल्या आपण व्हिडीओत आपण पाहू शकतो की, बॉलिवूडच्या दोन दिग्गज कलाकारांनी बॉबी देओलच्या सुपरहिट गाण्याची सिग्नेचर स्टेप केली आहे. जी पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. तुम्ही पाहू शकता की, कश्या प्रकारे सलमान आणि धर्मेंद त्याच्या डोक्यावर काचेचं ग्लास ठेवून डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ते ही स्टेप करण्यात अपयशी ठरतात.  

 याचबरोबर त्यांच्यासोबत स्टेजवर कृष्णा अभिषेक, अरबाज खान आणि मीका सिंहदेखील ही फेमस डान्स स्टेप कॉपी करताना दिसले. बिग बॉासचा हा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला. मात्र या शोच्या प्रोमोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा पूर आला आहे.'बिग बॉस 17' बद्दल बोलायचं झालं तर आयशा खान शोमधून बाहेर पडली आहे. वास्तविक, आयशाची तब्येत अचानक बिघडल्याने मेकर्सनी तिला मेडिकल इमर्जन्सीमुळे घराबाहेर काढलं आहे.

संदीप रेड्डी वंगाने 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात रणबीर कपूर, रश्मिका, बॉबी देओल, अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाने भारतात तसच जगभरात कोट्यवधींची कमाई केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटातील 'जमाल कुडू' गाण्यातील हावभाव आणि डान्ससाठी अभिनेता बॉबी देओलचं कौतुक होत आहे. 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. या चित्रपटातील गाणीही तुफान व्हायरल झाली आहेत. 'जमाल कुडू' या इराणी गाण्यावर बॉबी देओल थिरकताना दिसत आहे. या इराणी गाण्यावर डान्स करतच चित्रपटामध्ये बॉबीची एन्ट्री होते. या एन्ट्रीची ही तुफान चर्चा आहे. मात्र सोशल मीडियावर या गाण्यासंदर्भातील वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.