'रेस 3' सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंगची कमाई एवढी?

'रेस 3' सगळ्यांसाठी खास 

'रेस 3' सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंगची कमाई एवढी?  title=

मुंबई : सलमान खानचा 'रेस 3' हा सिनेमा आज म्हणजे 15 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला अॅडव्हान्स बुकिंग पाहायला मिळाली. असं म्हणलं जातं की,  'रेस 3'  या सिनेमाने सलमान खानच्याच सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. सलमान खानचा 'टायगर जिंदा है' या सिनेमापेक्षा 'रेस 3' हा सिनेमा भरपूर कमाई करणार असल्याचं म्हटलं जातं आहे. या सिनेमाला टायगर जिंदा है पेक्षा अधिक अॅडव्हान्स बुकिंग झालं असल्याचं म्हटलं जातं आहे. 

असं म्हटलं जातंय की, सलमान खानच्या  'रेस 3' ला 100 करोडहून अधिक कमाई ही फक्त अॅडव्हान्स बुकिंगमधून मिळाली आहे.  'रेस 3' ची डिमांग बघता अॅडव्हान्स बुकिंग ही रविवारपासूनच सुरू झाली आहे. डिस्ट्रीब्यूटरने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर, रायपूर, बिलासपूर, जबलपूर आणि कोरबामध्ये चांगली अॅडव्हान्स बुकिंग मिळाली आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधये देखील चांगल्याप्रकारे अॅडव्हान्स बुकिंग मिळालं आहे. यावरून हा सिनेमा सुपरहिट होणार यात शंका नाही. 

तसेच दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरने दिलेल्या माहितीनुसार,  'रेस 3' या सिनेमाला टायगर जिंदा है पेक्षा जास्त चांगली ओपनिंग मिळणार आहे असं म्हटलं जातं आहे. ट्रेड एनालिस्टच्या मते पहिल्याच दिवशी 30 -35 करोड रुपयांची कमाई होईल यात काही शंका नाही. पहिल्या विकेंडमध्ये या सिनेमाला 100 करोड रुपये कलेक्शन मिळेल. अॅडव्हान्स बुकिंगकडे लक्ष देता  'रेस 3' हा सिनेमा या वर्षीचा सर्वात जास्त ओपनिंग कमाई केलेला सिनेमा ठरेल यात शंका नाही. आता हा रेकॉर्ड बागी 2 च्या नावावर आहे. 

2017 च्या ईदवर सलमान खानने 'सुल्तान' हा सिनेमा रिलीज केला. पहिल्या तीन दिवसांत या सिनेमाने 105.53 करोड रुपये अशी कमाई केली आहे. त्या अगोदर भाईजानने 'बजरंगी भाईजान' या सिनेमाने ओपनिंग कमाई ही 102.6 करोड केली होती.