सलमान आणि शाहरुख या सिनेमात दिसणार एकत्र

बॉलिवूडचे करण-अर्जुन पुम्हा एकत्र

Updated: Nov 4, 2018, 03:44 PM IST
सलमान आणि शाहरुख या सिनेमात दिसणार एकत्र title=

मुंबई : बॉलिवूडचे खान सलमान आणि शाहरुख लवकरच एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्यात वाद झाला असला ते पुन्हा एकदा मित्र बनले आहेत. करण-अर्जुन ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमामध्ये शाहरुखने छोटासा रोल केला होता. त्यानंतर दस का दममध्ये देखील तो आला होता. शाहरुखच्या झिरो सिनेमामध्ये सलमान खान दिसणार आहे.

बॉलिवूडचे करण-अर्जुन सलमान आणि शाहरुख पुन्हा एकत्र यावे अशी त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे. पण सध्या कोणताचे फिल्म मेकर या दोघांना एकत्र आणण्याची हिम्मत नाही करत आहे. पण संजय लीला भंसाली यांच्या सिनेमात शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. 

संजय लीला भंसाली त्यांच्या एक सिनेमात या दोन सुपरस्टार्सला एकत्र आणणार आहेत. हा एक ड्रामा सिनेमा असल्याचं देखील बोललं जात आहे. या सिनेमात दोघांचाही समान रोल असणार आहे. सध्या भंसाली हे सिनेमाच्या फायनल ड्राफ्टमध्ये लागले आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाची स्क्रीप्ट फायनल झाल्यानंतर दोन्ही स्टार्ससोबत चर्चा केली जाणार आहे. याआधी करण-अर्जुन, कुछ कुछ होता है आणि हम तुम्हारें हैं सनम सारख्या सिनेमातून दोघांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 

काही दिवसांपूर्वी गुलशन ग्रोवर यांनी म्हटलं होतं की, सौदागरच्या रिमेकमध्ये त्यांना सलमान-शाहरुख यांना एकत्र पाहायचं आहे. 1991 मध्ये बनलेल्या सौदागर या सिनेमात राजकुमार आणि दिलीप कुमार यांची मैत्री पाहायला मिळाली होती. सुभाष घई पुन्हा एकदा सौदागर सिनेमाचा रिमेक घेऊन येणार आहेत.